कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूरात गेली अनेक वर्षे अनेक सामाजिक उपक्रम राबविणारी अमिताभ बच्चन एक्स्टेंडेड फॅमिली टिम कोल्हापूर आणि अमिताभ फॅन्स क्लब कोल्हापूर यांचे तर्फे महानायक अमिताभ बच्चन यांचा ८३ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात सीपीआर रुग्णालयात साजरा करण्यात आला. ग्रुप सदस्य शाम नोतानी परिवार यांच्या सहकार्यातून एक हजार पेक्षा जास्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच उपस्थित लोकांना प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच अमिताभ बच्चन यांना दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना सर्वांतर्फे करण्यात आली.

या प्रसंगी ग्रुपचे शामभाई नोतानी, अ‍ॅड इंद्रजित चव्हाण, दिनेश माळी, स्मिता सावंत, स्मिता घोसाळकर, राजू जोशी, किरण शहा इत्यादी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.