इचलकरंजी (प्रतिनिधी) : आमदार राहुल आवाडे यांनी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनला भेट देऊन नव्याने वस्त्रोद्योग मंत्रालयाने वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट घातलेली आहे याबाबत सविस्तर माहिती घेतली. २०२२ साली असाच शासन निर्णय झाला होता. त्यास संपूर्ण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग केंद्रातून विरोध झाला होता. व त्यानंतर तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री यांनी ऑनलाईन नोंदणीची अट रद्द केली होती. याबाबत मंगळवारी मुंबईत बैठक घेणार असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले.

याबाबत इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाईन नोंदणी करतान येणाऱ्या तांत्रिक अडचणीबाबत माहिती दिली. यामुळेच यापूर्वी दोन्ही वेळेला ही अट मागे घ्यावे लागलेचे निदर्शनास आणून दिले. यानंतर तत्काळ आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांचेशी संपर्क साधून याविषयाचे गांभिर्य विषद केले आणि ऑनलाईन नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. तत्काळ याबाबत तोडगा काढणेबाबत विनंती केली. त्यास अनुसरून या विषयावरती १४ ऑक्टोबर रोजी मंत्री संजय सावकारे यांनी बैठक आयोजित केलेली आहे.

याबरोबरच १ जुलै पासून उद्योगाचे वीज दर व रिडींग पद्धतीमध्ये वाढ व बदल झालेला आहे. यंत्रमाग उद्योगाचे वीज बिले मोठ्या प्रमाणात वाढून येत आहेत. यावर तोडगा काढणेसाठी मा. मुख्यमंत्री यांचे बरोबर बैठक लवकरच आयोजीत करावी अशी विनंती इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या वतीने करणेत आली. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी मी मुख्यमंत्री यांचेबरोबर बैठक आयोजित करणेबाबत प्रयत्नशील असलेचे सांगितले.

यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, पांडूरंग सोलगे, दत्तात्रय टेके, राजाराम गिरी, सेक्रेटरी एस.डी. जोशी उपस्थित होते.