कळे ( प्रतिनिधी ) बाजारभोगाव, ता.पन्हाळा येथे बस स्टॅन्डच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये लोकांकडून कल्याण मटका घेताना पोलिसांनी कारवाई करत संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसाक मटका बुकीचा मालक वैभव भगवान पाटील (वय६१) रा.बाजारभोगाव ता.पन्हाळा व शामराव लक्ष्मण पोवार (वय ४०) रा.करंजफेन ता.शाहूवाडी ( फरार ) यांच्यावर सोमवार दि.१६ रोजी. कळे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

या कारवाईत एकूण ३०५० रुपयांची रोख रक्कम व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद कळे पोलिस ठाण्याचे सहा.फौजदार नामदेव आकाराम चौगले यांनी दिली असून पुढील तपास पो.हे.कॉ. होळी करत आहेत.