मुंबई – लयं फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला कायं माहिती?..दिसत नाही अजून.. बर्फात जाऊन झोपला का कायं हिमालयात.. असे म्हणत मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टोला हाणला आहे. नाशिकच्या लोकसभेतून छगन भुजबळांनी माघार घेतल्यानंतर काल पुण्याच्या भोरमध्ये एका कार्यक्रमात मनोज जरंगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाण साधला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे..?

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक होऊ लागले आहे. ८ जून रोजी त्यांच्या होणाऱ्या सभेची जय्यत तयारी चालली आहे. ही सभा विश्वविक्रमी करण्यात येणार आहे. त्याचवेळी विरोधकांना घेरण्याची तयारी मनोज जरांगे करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. अशातच मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.लयं फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला कायं माहिती?..दिसत नाही अजून.. बर्फात जाऊन झोपला का कायं हिमालयात.. असे म्हणत जरांगे यांचा पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टोला हाणला आहे.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, मी सगळे तुमच्या ताकदीवर नीट केलेले आहेत. पहिल्यांदा आपली जात एकत्र नव्हती. त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी उचलला. आपला छळ केला. पण आता समाज एक झालाय. लोकसभा निवडणुकीत कुणाला ना पाडा म्हटले, ना कुणाला निवडून आणा म्हटलेयं. तुम्हाला पाडायच आहे, त्यांना पाडा, पण पाडताना एवढ्या ताकदीने पाडा की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्यांना उभे राहता येणार नाही. एवढी ताकद यावेळी मराठ्यांनी यावेळी दाखवावी, हे मी मराठ्यांना सांगितले आहे, असे ते म्हणाले. आता यावर मंत्री छगन भुजबळ काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचं असणार आहे.