मुंबई/प्रतिनिधी : राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीत अजून काही ठिकाणी जागा वाटपावरून तेढ कायम आहे. तर महायुतीत शिंदे गटाच्या काही जागा बदलण्याच्या चर्चा सुरु आहेत. महायुतीमधील घटक पक्ष शिंदे गट यांची कल्याणची जागा भाजपा लढवणार असं म्हटलं जात होतं. कारण कल्याण लोकसभेचे खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आहत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते. त्यावरून महायुतीत राजकारण रंगालं होतं. असं असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेच्या जागेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

कल्याण लोकसभेची जागा शिंदे गटाला मिळावी यासाठी शिंदे गात आग्रही असताना देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार हे डॉक्टर श्रीकांत शिंदेंच असतील, असे म्हंटले आहे. त्यामुळे कल्याणची जागा शिवसेनच्या पारड्यात पडली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांना महायुतीतील सर्व पक्ष साथ देऊन बहुमताने निवडून आणतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. म्हणजे आता कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे.
भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर नागपुरात देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. त्यावेली त्यांनी ही घोषणा केली. श्रीकांत शिंदे यांनी आधीच प्रचाराला सुरूवात केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
भारतीय जनता पक्षाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असतील. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळीपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे- भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासप-आमची जी बृहद युती आहे, त्यांना निवडून आणेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

वैशाली दरेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्यात लढत
शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली यामध्ये कल्याण मधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली. वैशाली दरेकर या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या आहेत. ठाकरे यांनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याने कल्याण लोकसभेमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्यात थेट लढत होणार आहे.