कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेना पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख महादेव सलवदे आणि उपविभाग समन्वयक सौरभ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कोल्हापूरात नुतन पदाधिकारी निवडीसह कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया टीमची आढावा बैठक पडली.  या बैठकीत आगामी राजकीय आणि संघटनात्मक उपक्रमांसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा तसेच सोशल मीडिया माध्यमातून प्रभावी प्रचारासाठी नियोजन करण्यात आले.

या बैठकीदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील सोशल मीडिया कार्याचा आढावा घेऊन, पक्षाच्या विचारधारा, कार्यप्रणाली आणि शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख दृष्टीकोन अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली.

यावेळी जयवंत बर्गे, ओंकार कोळी, अक्षय घाडगे, अमोल नवले, प्रथमेश देसाई, इंद्रजीत देसाई, युवराज लाटकर, सुनील रेडेकर, स्वप्निल पाटील, विनायक जितकर, अमित शिरगुरे, संतोष साबळे, स्वराज पाटील, सुखाराम भालबर, शिवानंद पणदे, शिवाजी कोळी, धैर्यशील माने, सुनील नरुटे, प्रथमेश पाटील, शिवाजी कोळी उपस्थित होते.