कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांचा अज्ञाताने धारधार शस्त्राने हातावर व पायावर वार करुन सुनिल भिमराव चव्हाण या शेतकर्‍याचा खून केल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी अवघ्या आठ तासात छडा लावला असून 10 जणांना ताब्यात घेतले होते, यातील 9 जणांना येथील न्यायालयात उभे केले असता त्यांना ३ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


या प्रकरणातील संशयित राहूल किरण भबिरे ( रा. कुरुंदवाड) व पवन नागेश कित्तुरे यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता पूर्ववैमनस्यातून राहूल भबिरे यांने पवन कित्तुरे याच्या मदतीने 8 जणांना सुपारी देवून सुनिल चव्हाण यांच्यावर कट रचून कोयत्याच्या सहाय्याने वार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


या प्रकरणीराहूल किरण भंबीरे (रा.कुरुंदवाड) पवन नागेश कित्तुरे (रा. परीट गल्ली कुरुंदवाड) , सागर अरविंद पवार (रा. विटा ता. खानापूर जि. सांगली ), शहाजान अलाब्क्ष पठाण ( रा. कृष्णानगर गल्ली नं. 4 इचलकरंजी ), अनिकेत दत्तात्रय ढवणे ( रा.कराड रोड शाहुनगर विटा ता. खानापूर जि.सांगली ), तुषार तुकाराम भारंबल रा.कराड रोड शाहूनगर विटा, रोहन किरण जावीर रा. यशवंतनगर विटा, रितेश विकास खरात ( रा. साई शंकर रोड महात्मा गांधी शाळेजवळ विटा, सोहन माणिक ठोकळे ( रा. जुना वासुंबे रोड आदर्शनगर विटा यांना येथील न्यायालयात उभे केले असता त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.