कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेस पीपीई किट भेट देण्यात आली. तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाबाबत खबरदारी घेणेसाठी उद्योजक आणि कामगार बंधू यांच्यामध्ये जनजागृती होण्यासाठी असोसिएशनच्यावतीने पोस्टर, स्टिकर प्रसिध्द करण्यात आली असून याचे अनावरन महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. 

तसेच आयुक्तांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने 100, प्रियदर्शन पॉलिसॅक लि.ने 100, गणेश हौसिंग सोसायटीने 100, रणजीत शाह यांनी वैयक्तिक 50, तसेच गणेश हौसिंग सोसायटीमधील वैयक्तिक आनंद पाटील 20, दत्तात्रय इंगवले10 आणि प्रतापसिंह घाडगे 20 यांच्यावतीने अशी एकूण 400 पीपीई किट महानगरपालिकेच्या कोरोना योध्ये तसेच स्मशानभूमित काम करणा-या कर्मचा-यांसाठी पीपीई किट भेट देण्यात आले.यावेळी आयुक्तांचा त्यांनी विविध पातळीवर केलेल्या आणि करीत असलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल असोसिएशनच्यावतीने शाल, श्रीफळ, झाडाचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी रणजीत शाह, हर्षद दलाल,दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे, नितिन वाडीकर, बाबासाहेब कोंडेकर, अभिषेक सावेकर, जयदिप मांगोरे, नेमचंदभाई संघवी, आनंद पाटील, दत्तात्रय इंगवले, प्रतापसिंह घाडगे, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते.