दिंडनेर्ली ( प्रतिनिधी ) : जैताळ तालुका करवीर येथील फाट्यावरती (मोरे सासणे) फार्म हाऊस मध्ये पोलिसांनी छापा टाकून तीन पाणी जुगार खेळणाऱ्या दहा जणांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी 1लाख 12 हजार रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे. फार्म हाऊस मालक प्रमोद सासणे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यामधील आरोपींची नावे अनिकेत आनंदा पाटील, गणेश बाबुराव पाटील (वाघुर्डे. ता पन्हाळा), संजय अंतू सावंत (विक्रमनगर कोल्हापूर), ललित राजसिंग राजपूत ( रंकाळा कोल्हापूर), निशांत नागनाथ पुणेकर (लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर), तानाजी बंडू दळवी ( रा. पन्हाळा), सुरज प्रकाश सदलगे (जवाहर नगर कोल्हापूर), दीपक मोरे (राजारामपुरी कोल्हापूर), योगेश चौगले( कोल्हापूर), फार्महाउस मालक प्रमोद सासणे (कोल्हापूर) अशी आहेत. तर पुढील तपास इस्पूर्ली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख, पोलीस उपनिरीक्षक नलवडे हे करत आहेत.