कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. दोन दिवसापूर्वी लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये घडलेल्या हत्येनंतर तरुणाने सुद्धा केलेल्या आत्महत्येनंतर कोल्हापूर हादरलं निघालं होत, आता अशाच प्रकारची हत्येची घटना समोर आलीय. कोल्हापुरात एका जिवलग मित्रानेच आपल्या मित्राचा काटा काढला आहे, एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मित्रानेच मित्राला संपवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील करवीर तालुक्यामध्ये घडला.
मिळलेल्या माहितीनुसार, केर्लेपैकी हनुमान नगरातील खाणीमध्ये मृत्यू झालेल्या महेंद्र प्रशांत कुंभार (वय 18) या युवकाचा मृत्यू झाला असून त्याचा जिवलग मित्राने खून केल्याचे समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये संबंधित अल्पवयीन मित्राला पोलिसांनी ताब्यात घेत पंधरा दिवसांसाठी बालसुधारगृहामध्ये पाठवलं आहे.
केर्ले गावामधील महेंद्र आणि अल्पवयीन आरोपी मित्र लहानपणापासून जिवलग मित्र होते. इतकंच नव्हे तर एकाच बाकड्यावरती ते बसत होते. दोघांनी सुद्धा बारावी परीक्षा एकत्रित पास केली होती. इतकी या दोघांची घनिष्ठ मैत्री होती. मात्र, या मैत्रीमध्ये एकामुलीमुळे दोघांमध्ये वितूष्ठ निर्माण झाले होते. महेंद्रचे गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याच मुलीवर अल्पवयीन आरोपी मुलगा सुद्धा एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे महेंद्र आणि ती मुलगी एकमेकांशी बोलून भेटून त्यांचं फिरणं सुरू असल्याने एकतर्फी प्रेम करणाऱ्या अल्पवयीन आरोपी मित्राला याचा राग येत होता.त्यामुळे एकतर्फी प्रेमात आपलाच जिवलग मित्र महेंद्र हा प्रेमामध्ये अडचण वाटू लागला होता. त्यामुळे या दोघांमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये वाद सुद्धा झाला होता. दरम्यान 3 जून रोजी महेंद्रला अल्पवयीन आरोपीने मोहित्यांच्या खाणीजवळ बोलवून घेतलं होतं. यावेळी दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली.
यावेळी आरोपी अल्पवयीन मित्राने महेंद्रचा मोबाईल सुद्धा फोडून टाकला आणि त्याच्या दुचाकीची चावीसुद्धा फेकून दिली. यानंतर आणखी वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने जोरदार धक्का दिल्याने महेंद्र सव्वाशे फूट खोल खणीत कोसळला. यामुळे महेंद्रला गंभीर धोखापत झाली होती. फोन बंद असल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता खणीमध्ये तो पडून होता. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधून काढले असता शेवटचे लोकेशन खणीजवळच सापडून आले. संशयिताची कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबूली दिली.