टोप (प्रतिनिधी) : गावे सुधारली, गावाचा विकास झाला, तरच राज्य, देशाचा विकास होईल, असे प्रतिपादन बीपीसीएल गॅसचे प्रमुख सुधाहर पी यांनी केले. ते  वडगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या नुतनीकरण व शुशोभिकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, नॅचरल गॅस गावागावात तसेच शहरात पाईपलाईनने पोहोचवण्याचे काम सध्या सुरु आहे. या गॅसपासून नागरिकांना कोणताही धोका पोहोचणार नाही. हा गॅस लिक झाला तरी लगेच हवेत मिसळत असल्याने कोणताही धोका निर्माण होणार नाही. तसेच माफक दरात हा गॅस उपलब्ध होणार आहे. पर्यावरणपूरक गॅस असल्याने पर्यावरणास कोणतेही हानी होत नाही.

यावेळी सरपंच काशीनाथ कांबळे यांनी ग्रामपंचायत नुतनीकरणास तसेच शुशोभिकरणासाठी निधी दिल्याबद्दल बीपीसीएलच्या प्रमुखांचे आभार मानले.

यावेळी सरपंच काशीनाथ कांबळे, उपसरपंच सुभाष आकिवाटे, मानसिंग रजपूत, उदय चौगुले, महेश काबरे, अविनाश पाटील, किरण चौगले, आश्विनी लोडे, नितीन घोरपडे, पोलीस पाटील विजय मगदूम, आमिन हजारी, संतोष लोंडे, ग्रामसेवक पी. डी. मुसळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.