मुंबई (प्रतिनिधी) : नव्या व्हेरियंटनंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 826 नवीन रुग्ण आढळले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात सर्वाधिक 134 बाधितांची नोंद झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटकात 131 रुग्ण आढळले आहेत. बिहार, कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. यासह, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4000 च्या वर गेली आहे.

आज (रविवार) देशात कोरोनाची 826 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि तीन लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज नवीन रुग्ण आढळल्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 4309 झाली आहे. सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा पहिल्यांगाचा कोरोनाची इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे आता देभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

आज सकाळी 8 वाजता केलेल्या नवीन आकडेवारीनुसार. शनिवारी 3,997 वरून 841 नवीन प्रकरणांसह रुग्णसंख्या 4,309 वर पोहोचली होती. केरळ, कर्नाटक आणि बिहारमध्ये प्रत्येकी एका मृत्यूसह देशात विषाणूमुळे तीन नवीन मृत्यू झाले आहेत.