मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात जेव्हा ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल, तेव्हा लॉकडाऊन लावण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, राज्यात ओमायक्रॉनचा प्रसार दुप्पट वेगाने होत असल्याने सगळ्यांनी सतर्कता बाळगावी. ओमायक्रॉनसाठी ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. आम्हाला आणखी कडक निर्बंध लावण्याची, लादण्याची इच्छा नाही. त्यासाठी राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उपहारगृह, सिनेमागृह आणि बंदिस्त ठिकाणी एकूण क्षमतेच्या ५० टक्केच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून खबरदारीच्या उद्देशाने निर्बंध लागू करण्यात आले आहेत, असेही आरोग्यमंत्री म्हणाले.