साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा येथील परशुराम विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज या प्रशालेत आज गगनबावडा तहसील विभागाच्या वतीने ई पीक पाहणी सबंधी माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गगनबावडा तहसील चे मंडल अधिकारी उदय लांबोरे यांनी विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत पीक पाहणीचा डेमो दाखवला. यावेळी बावेली तलाठी दिगंबर शिकलकर, गगनबावडा तलाठी राजेश कुंटे, कोतवाल प्रशांत तटकरे, कोतवाल अशोक गुरव आदी उपस्थित होते.