आजरा (प्रतिनिधी) : नोकरीच्या मागे न लागता पदवीधरांनी व्यवसाय उभा करून स्वावलंबी व्हावे. त्यांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी संधी देणे आवश्यक आहे, असे मत पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केले. अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.   

देशमुख म्हणाले की, सरकारच्या विविध महामंडळाच्या माध्यमातून पदवीधरांसाठी प्रभावीपणे योजना राबवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नशील राहू. त्यासाठी या निवडणुकीत मला संधी द्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष चराटी, साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

आजरा सूतगिरणीचे उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, जिल्हा परिषद सदस्य सुनिता रेडेकर, अरुण देसाई, मलिककुमार बुरुड,  नगरसेविका शुभदा जोशी, नयन भुसारी, विजय पाटील, किशोर पारपोलकर आदी उपस्थित होते.