पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार येथे उड्डाणपुला जवळ भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी आहेत यातील दोघेजण गंभीर जखमी आहेत सर्व जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हातकणंगले तालुक्यातील भादुले इथल्या सेंट्रींग कामगारांना घेऊन जाणारा एक टेम्पो रस्त्याशेजारी थांबला होता तर सेंट्रींग मशीन बाजूला घेण्याचं काम सुरू होतं इतक्यात भरधाव आलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून सात जण जखमी झालेत यापैकी दोघेजण गंभीर आहेत बाबालाल इमाम मुजावर वय 50 सचिन धनवडे वैचारिक विकास वड वय 32 सर्व राहणार भादुले तालुका हातकणंगले अशी मयत झालेल्यांची नावे आहेत तर चौथ्या मैताचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.