मुंबई (प्रतिनिधी) : कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत सुमारे ८५ डॉलरपर्यंत वाढली आहे. आजच्या दरांनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड २.९४ डॉलर म्हणजेच, ३.६३ टक्क्यांनी वाढून ८३.९२ डॉलरवर आणि क्रूड २.०७ डॉलर म्हणजेच २.६७ टक्क्यांनी वाढून ७९.५६  डॉलरवर पोहोचलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. 

भारतीय तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून, दरांत कोणताही बदल झालेला नाही. वाहतूक खर्चामुळे देशांतील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत थोडाफार फरक झालेला आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील शेवटचा बदल मे-२०२२ मध्ये केंद्र सरकारकडून करण्यात आला होता.