मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून त्यांनी स्वतःच आज याबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधान आल होतं. या चर्चांना आता त्यांनीच पुर्णविराम दिला आहे.आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असल्याच बोललं जातं.एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच वेट अँड वॉच असे वक्तव्य केल्यामुळे ते त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी दिल्ली गाठत यासंदर्भात पक्ष नेतृत्वासोबत चर्चा केली होती. मात्र स्थानिक नेत्यांचा तसेच काही मातब्बर भाजप नेत्यांचा विरोध पाहता त्यांचा पक्षप्रवेश लांबला. मात्र आज त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना विराम देत लवकरच स्वगृही परतणार असल्याचं म्हटलं आहे. अजित पवारांनी शरद पवारांपासून सवता सुभा मांडत पक्षच काबीज केला.आता परत एकदा लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमार्फत करेक्ट कार्यक्रम करत शरद पवारांना धक्का देण्यात आलाय.