साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा येथील परशुराम विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये तहसील विभागाच्या वतीने ई पीक पाहणी संबंधी माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी गगनबावडा तहसीलचे मंडल अधिकारी उदय लांबोरे यांनी विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत पीक पाहणीचा डेमो दाखवला. यावेळी बावेली येथील तलाठी दिगंबर शिकलकर, गगनबावडाचे तलाठी राजेश कुंटे, कोतवाल प्रशांत तटकरे, कोतवाल अशोक गुरव आदी उपस्थित होते. यावेळी मंडल अधिकारी व तहसील विभागाचे प्राचार्य गोसावी यांनी आभार मानले.