उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णता प्रचंड वाढलेली असते. त्यामुळे, शरीरातील पाणीही कमी होते. अशावेळी पाण्याचं प्रमाण शरीरात वाढवणं गरजेचं ठरतं. त्यामुळेच, आपल्याला सतत तहान लागत असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फक्त पाणीच नव्हे तर इतरही अनेक पेये प्यावीशी वाटतात. अनेक जण ती पितात. मात्र, ती पेय कोणती प्यावे जनेकरून आरोग्याला त्याचा फायदा होईल. आज आपण जाणून घेणार आहोत

ताक

ताक म्हणा किंवा मठ्ठा दोन्हींचेही अनेक आरोग्य फायदे आहेत. ताक हे प्रोबायोटिक पेय आहे. हे आतड्यासाठी खूप चांगले आहे. हिंग, चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि दही वापरून बनवले जाते. हे एक अतिशय चवदार पेय आहे. शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आपण ताकाचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आणि फायदेशीर आहे.

नारळ पाणी

नारळ पाणी हे उन्हाळ्यातील एक उत्तम पेय आहे. उन्हाळ्यात याचे नियमित सेवन करावे. हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते. त्यामुळे किडनी स्टोन रोखण्यास मदत होते. तसेतर बाराही महिने नारळाच्या पाण्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यामुळे आपले त्वचा चांगली होण्यासही मदत होते.

जलजीरा

उन्हाळ्यात जलजीरा पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जलजीरा हे जिरे, आले, काळी मिरी, पुदिना आणि वाळलेल्या कैरीची पावडर वापरून बनवले जाते. या मसाल्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात. ते मळमळ, सूज आणि अपचन दूर करण्यासाठी कार्य करतात. त्यात पुदिन्याची पाने टाकल्याने उन्हाळ्यातही थंडावा मिळतो.

बेलाचा रस

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये ऊर्जावान राहण्यासाठी बेलाच्या रसाचे सेवन करणे खूप जास्त फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळे कोलेस्टेरॉल आणि कॅन्सरचा धोकाही कमी होतो.

कैरीचे पन्हे

कैरीचे पन्हे शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवण्याचे काम करते. तसेच उन्हाळ्यात कैरीचे पन्हं प्यायल्यास थकवा दूर होतो. यासोबत द्राक्षं, कलिंगड, संत्री, मोसंबी यांसारख्या फळांचा रस देखील उन्हाळ्यात शरीरास फायदेशीर ठरतो. म्हणून उन्हाळ्यात शीतपेय पिण्याऐवजी ही गुणकारी पेय पिणे कधीही चांगले.

कोकम सरबत

कोकम हे पित्तनाशक असल्यामुळे उन्हाळ्यात कोकम सरबत प्ययल्याने पित्ताचा त्रास होत नाही. कोकम सरबत प्यायल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते.

लिंबू सरबत

उन्हाळ्यात लिंबू सरबत प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. तसेच शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.