कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली असून डॉ. कादंबरी बलकवडे यांची नूतन आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. आज (गुरुवार) नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आयुक्त पदाचा कार्यभार मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांच्याकडूण स्विकारला.
नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे या २०१० च्या आयएएस बॅचच्या असून त्या २०१०-१५ या कालावधीत नागालॅण्ड येथे कार्यरत होत्या. २०१५-१६ त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी नागपूर, २०१६-१८ या कालावधीत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर येथे काम केले. तसेच २०१८ पासून त्या गोंदियामध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी गोंदिया येथे लोकसभा, विधानसभा, पोटनिवडणूकही यशस्वीपणे पार पाडली.
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये अधिक गतीमान, पारदर्शक, लोकाभिमूख आणि नियमांचे पालन करण्यावर आपला अधिक भर राहिल असे नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या. कोल्हापूर जिल्हयात काम करण्याची संधी मिळाली असून, महानगरपालिकेच्या माध्यमातून अधिक चांगले काम करुन राज्यातील एक आदर्श महानगरपालिका म्हणून लौकिक कायम राखू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.