टोप (प्रतिनिधी) : प्रशासकीय सेवेत ऊत्कष्ट काम करून विविध देशात भारताची अस्मीता आपल्या कार्यकर्तुत्वाने उंचावणारे डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या कार्याचा उचीत सन्मान व्हावा यासाठी शिवाजी विद्यापीठाची मानद डी. लीट. पदवी देऊन त्यांचा गौरव करावा. असे निवेदन सुमन साळी महिला व बाल विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा शिंगारे यांनी नुतन कुलगुरूंना दिले.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे देश सेवेमधील कार्य, त्याचबरोबर साहित्य साधना आणि विचारवंत म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल अनेक सामाजिक, शैक्षणिक, विविध विद्यापीठांनी आणि शासकीय अस्थापनांनी त्यांच्या सन्मान केला आहे. कोल्हापूर जिल्हयातील शिरोली मेन्यूफॅक्चर्स असोसिएशन, उद्यमनगर औद्योगीक वसाहत, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगीक वसाहत आणि कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन यांनी देखील डॉ. मुळे यांना मानद डी. लीट. पदवी देण्यासाठी जोर लावला असून याबाबतच्या निवेदनांच्या प्रती कुलगुरूंना देण्यात आल्या.

यावेळी नुतन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने असिस्टंट गव्हर्नर बाळासाहेब कडोलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन कुलगुरूचां सत्कार केला.

यावेळी क्लबचे सदस्य मानसिंग पानसकर, वारणा पडगावकर, प्रतिभा शिंगारे उपस्थित होते.