कोल्हापूर (प्रतिनिधी) : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी मोठे यश मिळवले आहे. कॉलेजचे १० विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये श्रेयश कुलकर्णी याने ९९.७१ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे.

ज्युनिअर कॉलेजच्या श्रेयश कुलकर्णी (९९.७१) सुयश चंद्रकांत पाटील (९८.९), आकाश सुहास आळतेकर (९८.६७), वरद कृष्णात पाटील (९६.०५), अनमोल गवळी (९४.६), मधुरा दिवटे (९३.७४), अथर्व पाटील (९१.१५), यश पारीख (९०.९७), ओजस कुलकर्णी (८९.९७), निधी पाटील (८९) हे विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत.

या सर्व विद्यार्थ्याना सायन्स विभागच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.