कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यात विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आंबर्डे येथील गजानन महाराज ट्रस्टच्या वतीने विद्यामंदिरमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी गजानन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष मकरंद बोरवणकर, ट्रस्टचे उपाध्यक्ष व ग्रा.पं.सदस्य सुरेश बोरवणकर, आरती बोरवणकर, महेश बोरवणकर, अशोक बोरवणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानदेव पाटील, मुख्याध्यापक चौधरी, शिक्षक शिंदे आदी उपस्थित होते.