कळे (प्रतिनिधी) : सावर्डे तर्फे असंडोली येथील विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांसाठी ‘एक झाड-एक पुस्तक’ हे अभियान राबवून शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके आणि रोपांचे वाटप भाजपाचे तालुका प्रतिनिधी प्रतापसिंह काळे यांनी केले.

‘पुस्तके ही नवीन पिढी घडवण्यासाठी उपयोगी पडतात, तर झाडे ही सर्वांना जगवण्यासाठी उपयोगी पडतात,’ असे मनोगत प्रतापसिंह काळे यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच भाग्यश्री बच्चे, उपसरपंच दीपाली पाटील, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पी. व्ही. पाटील, डी. बी. पाटील, संभाजी कापडे, विनोद पाटील, शिवाजी सातपुते, सदाशिव काळे, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.