सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील महे येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कोल्हापूर शाखेतर्फ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना मोफत सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बी. जी. पाटील आणि उपाध्यक्ष जगदीश पाटील यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कोल्हापूर शहराध्यक्ष पोतनीस आणि जिल्हा सल्लागार बहदरगे, दिनकर राणे, वैष्णवी गुरव, बी. जी. पाटील, यशवंत बँकेचे संचालक उत्तम पाटील, सज्जन पाटील, सर्जेराव हुजरे, बाबासो पाटील, भाऊसो पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच निवास पाटील यांनी आभार मांडले.