कोल्हापूर ( प्रतिनिधी ) प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहुन समाजाला न्याय मिळवून द्यावा, डिजिटल मिडिया क्षेत्राला प्रिंट मिडिया प्रमाणे स्वंतत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

कोल्हापूर श्री सिद्धगिरी कणेरी मठ येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे महाअधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दोन हजार हजार डिजिटल मिडिया क्षेत्रातील संपादक पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.

या अधिवेशनासाठी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. प्रारंभी अधिवेशनाचे उदघाटन करवीर नगरीचे शाहू महाराज छत्रपती ,राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील ,आयुष्यमान भारतचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे,खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने,

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य संघटक तेजस राऊत ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुहास पाटील,उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के,कोल्हापूर शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर,जिल्हा सचिव धीरज रुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्यभरातुन आलेल्या संघटनेच्या २ हजार संपादक प्रकारांच्या उपस्थितीत अधिवेशन संपन्न झाले.