कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शिवाजी विद्यापीठ म्हणजे कोल्हापूरकरांचा मान बिंदू विद्यार्थ्यांच्या अस्मिताचे बघण्याचे ठिकाण, पण शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात कुलुगुरु सारखं मानाचे पद पहिल्यांदाच रिक्त राहिलं. खरं बघायला गेलं तर हे दुर्दैव आहे. ज्या विद्यापीठाला एवढा मोठा वारसा त्याचं कुलगुरू पद रिक्त राहतं. ही कोल्हापूरकरांसाठी आणि सांगली सातारा या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे, म्हणून आज कोल्हापूर युवा सेनेच्यावतीने एक रिकामी खुर्ची ठेवून त्याच्या शेजारी कुलगुरू नेमावा अशा अनोख्या पद्धतीचे आंदोलन आज शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात करण्यात आले.

लवकरात लवकर कुलगुरू नेमला नाही तर युवा सेना शिवसेना विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, अशा पद्धतीचे निवेदन व निदर्शने आज करण्यात आली. हे निवेदन रजिस्टर व्ही येन, शिंदे यांना देण्यात आलं. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, शहर प्रमुख सुमित मेळवंकी, युवतीसेनेच्या कृष्णा जाधव, उपजिल्हा प्रमुख सदाशिव पवार, अक्षय घाटगे, लतीफ शेख,शुभम पाटील, अक्षय मोरे, रमेश वरुटे, सारंग कांबळे, योगेश लोहार, इंजिमाम मुल्ला आदी उपस्थित होते.