परभणी : दुपारी उन्हाचा तडाखा आणि मधूनच चक्रीवादळ असं एकूणच लोकांना संभ्रमात टाकणार वातावरण होत असल्याच दिसून येत आहे.पूर्णा  तालुक्यातील चुडावा गाव शिवारात (गुरुवारी) चक्रीवादळाने हाहाकार माजवला. यावेळी शेतातील जनावरांचे गोठे, मांडव अखाडे, रेशीम कोष निर्मीतीचे शेड, विजेच्या तारांसह खांब, आमराई फळझाडे उपटून पडल्‍याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

यावेळी चक्रीवादळाने उभे असलेले विजेचे खांब उपटून पडले. यामुळे तारा तुटल्या. यामुळे चुडावा परिसरात तीन दिवसांपासून विद्यूतपूरवठा बंदच आहे. तसेच चुडावा येथील चंद्रकांत हरिभाऊ देसाई यांचा रेषीम तुती कोष निर्मीतीचा शेड उध्वस्त झाला. त्याच बरोबर नानासाहेब देवराव देसाई यांच्या शेतातील रेशीम उत्पादनाचा कोष क्राप प्रक्रीया चालू असताना चक्रीवादळामुळे संपूर्ण जमिनीवर कोसळून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

येथील शेतकऱ्यांचे  इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असतानाही  येथील तलाठी खिल्लारे, मंडळ अधिकारी लटपटे, नायब तहसिलदार प्रशांत थारकर, तहसिलदार माधवराव बोथीकर, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर हे लोकसभा निवडणूक कामात व्यस्त झाले आहेत. त्यांनी वेळ काढून पूर्णा तालूक्यात वादळीवारा, अवकाळी पावसात शेती, घरे, विद्युत खांब, फळबागांच्या नुकसानीचे त्‍वरीत पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.