कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून ते आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात ६५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४११ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २२, आजरा तालुक्यातील २, भुदररगड तालुक्यातील २, चंदगड तालुक्यातील ३, गडहिंग्लज तालुक्यातील ६, हातकणंगले तालुक्यातील ९, करवीर तालुक्यातील ४, पन्हाळा तालुक्यातील २, राधानगरी तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील ५, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा एकूण ६५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान आजरा तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील २ आणि सांगली जिल्ह्यातील १ अशा ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४७, ७०८ वर पोहोचली असून ४४१२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर १६२१ जणांचा मृत्यू झाला असून सध्या १९५९ वर उपचार सुरु आहेत.