मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.  देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने १२  डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

देशमुख यांच्या जामीनाला स्थिगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे. अनिल देशमुख यांना ईडीने १ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली होती. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. परंतु आता त्यांचा  सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे