नरंदे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास ओजस्वी आणि तेजस्वी आहे. इथल्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक बहुआयामी एक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा गौरवशाली आहेत. दूरदृष्टी, नियोजन, परोपकारवृत्ती अशा अनेक गुणांतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई प्रसंग सांगितले . छत्रपती शिवाजी महाराजांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य फक्त भारतासाठी मर्यादित नसून ते जगाचे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. तसेच किल्ले संरक्षण, ऐतिहासिक वस्तूंची जोपासना, थोरांचा आदर्श घ्यावा असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रतापराव देशमुख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आजच्या युवकांसाठी आदर्श आहेत. इतिहास समजून घ्यावा , आणि या इतिहासातूनच नवीन युवक घडावा असे सांगून सदरचे व्याख्यान विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी शिवाजीराव देशमुख आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक यशवंत बोराटे यांनी केले आभार सहाय्यक शिक्षिका पी आर कुंभार यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका सुश्मिता शिंदे यांनी केले.
व्याख्यान कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष मान.प्रतापराव देशमुखसो, शाळा समितीचे चेअरमन हर्षवर्धनदादा देशमुख , निवासी शिक्षण संकुलाचे अधीक्षक विजयसिंह देसाई , मुख्याध्यापक एस टी गावडे उपस्थित होते.