रंकाळा विकासासाठी दरवर्षी १ कोटींचा निधी देऊ : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रंकाळा तलाव विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून दरवर्षी एक कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नातून रंकाळा तलाव परिसरात झालेल्या विविध विकासकामांचे व स्वयंचलित पद्धतीने बसविलेल्या विविध प्राण्यांच्या प्रतिकृतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागाकडे… Continue reading रंकाळा विकासासाठी दरवर्षी १ कोटींचा निधी देऊ : पालकमंत्री

शहा-पवार यांची भेट न झाल्याचे सांगण्याची ‘त्यांच्या’ नेत्यांमध्येच स्पर्धा : चंद्रकांतदादांचा टोला

पुणे (प्रतिनिधी) :  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित भेटीच्या वृत्तानंतर काल दिवसभर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. शरद पवार आणि अमित शाह यांच्यात नक्की भेट झाली का, हे मला माहिती नाही. पण अमित शाह यांनी काल केलेलं वक्तव्य पाहता ही भेट झाली… Continue reading शहा-पवार यांची भेट न झाल्याचे सांगण्याची ‘त्यांच्या’ नेत्यांमध्येच स्पर्धा : चंद्रकांतदादांचा टोला

पंचगंगा साखर कारखाना परिसरातील मजुरांच्या झोपडयांना आग

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना परिसरातील ऊसतोड मजुरांच्या झोपडयांना आज (गुरूवार)   दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन मजुरांच्या झोपडया जळून खाक झाल्या. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीत प्रापंचिक साहित्य, २८ हजारांची रोकड, १ तोळा सोन्याचे दागिने जळून खाक झाले आहेत. तर १ म्हैस… Continue reading पंचगंगा साखर कारखाना परिसरातील मजुरांच्या झोपडयांना आग

कोल्हापुरातील ‘त्या’ आमदारावर भाजपसोबत जाण्यासाठी रश्मी शुक्लांनी आणला होता दबाव : आव्हाडांचा गौप्यस्फोट

मुंबई (प्रतिनिधी) : शिरोळचे अपक्ष आमदार व राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपबरोबर राहण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज (गुरुवारी) दुपारी ट्वीट करून केला आहे. … Continue reading कोल्हापुरातील ‘त्या’ आमदारावर भाजपसोबत जाण्यासाठी रश्मी शुक्लांनी आणला होता दबाव : आव्हाडांचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडी सरकारविरोधातील भाजपच्या अभियानाला प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर भाजपच्या वतीने शहरात भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली “महाविकास आघाडी सरकारला जाब विचारूया – जनतेशी संवाद साधूया”  हे अभियान आज (गुरूवार) राबविण्यात आले. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, गुन्हेगारी अशा दुष्कृत्यांचा पाढा वाचण्यासाठी, महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येण्यासाठी हे अभियान राबवत असल्याचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी… Continue reading महाविकास आघाडी सरकारविरोधातील भाजपच्या अभियानाला प्रतिसाद

‘शाहू’ कारखान्याची ऐतिहासिक कामगिरी : हंगामात १० लाख मे. टन ऊस गाळप

कागल (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात उच्चांकी १० लाख मे. टन ऊस गाळपाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे प्रतिदिनी ७५०० मे.टन  गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याने जवळपास गाळप क्षमते इतक्या सरासरीने गाळप करून हा यशस्वी टप्पा पूर्ण केल्याचे   शाहू प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. व्यवस्थापनाने या हंगामासाठी… Continue reading ‘शाहू’ कारखान्याची ऐतिहासिक कामगिरी : हंगामात १० लाख मे. टन ऊस गाळप

…अन्यथा इचलकरंजी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण करू : राजेश बांगड

शिरोळ (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील दत्तगोविंद डेव्हलपर्सच्या दत्त अपार्टमेंटच्या भागीदार यांनी खोटी कागदपत्रे सादर करून शासकीय नियमांचे उल्लंघन करून नगरपरिषदेकडून भोगवटा प्रमाणपत्र घेतले आहे. तरी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ३० मार्चला नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण करू, असा इशारा राजेश बांगड यांनी दिला आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दत्तगोविंद डेव्हलपर्सच्या दत्त अपार्टमेंटच्या… Continue reading …अन्यथा इचलकरंजी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण करू : राजेश बांगड

आता बंटी बबलीची जोडी मीडियात धुमाकूळ घालतीय : सुरेश खोपडे

मुंबई (प्रतिनिधी) : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. यावरून माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांना ‘बंटी बबली’ असे म्हणत निशाणा साधला आहे. याबाबत खोपडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गृहमंत्र्यांनी एका कनिष्ठ… Continue reading आता बंटी बबलीची जोडी मीडियात धुमाकूळ घालतीय : सुरेश खोपडे

संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे..? : काँग्रेस नेत्याचा टोला

मुंबई (प्रतिनिधी) : संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, असा गोंधळ निर्माण झालेला आहे, असा टोला काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएचे अध्यक्षपद भूषवायला पाहिजे, असे   संजय राऊत… Continue reading संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे..? : काँग्रेस नेत्याचा टोला

‘गोकुळ’ निवडणूक : उमेदवारांना २ लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी आजपासून (गुरूवारी) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवाराचे स्वतंत्र बॅंक खाते असणे आवश्‍यक आहे. निवडणुकीचा खर्च या खात्यातून कऱणे बंधनकारक असून २ लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा असेल, अशा सूचना  निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी पत्रकाद्वारे दिल्या आहेत. या पत्रकात म्हटले आहे… Continue reading ‘गोकुळ’ निवडणूक : उमेदवारांना २ लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा

error: Content is protected !!