‘ते’ म्हणाले, चंद्रकांत पाटील माजी मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने सांगली जिल्ह्यातील भाजप नेते व सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, मुंबईत भाजपाने आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना उमेदवार देशमुख यांच्याकडून चूक झाली. त्यांनी कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा माजी मुख्यमंत्री असे संबोधले. देशमुख यांच्या या उल्लेखाने अनेकांच्या… Continue reading ‘ते’ म्हणाले, चंद्रकांत पाटील माजी मुख्यमंत्री

पदवीधरमध्ये कोल्हापूर निर्णायक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे पदवीधरमध्ये भाजपकडून सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख तर राष्ट्रवादीचे अरुण लाड महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने लढत चुरशीने होणार आहे. पण पाच जिल्ह्याच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदार कोल्हापूर जिल्हयात असल्याने विजयी उमेदवारासाठी हा जिल्हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सोलापूर,… Continue reading पदवीधरमध्ये कोल्हापूर निर्णायक…

पोलिसांची माफी मागा, अन्यथा सर्व धंदे बाहेर काढू..!

रत्नागिरी (प्रतिनिधी) :  कोणताही पुरावा नसताना पोलीस हप्ते घेतात, हे म्हणणं बेजबाबदार आहे. आणि असे वक्तव्य करणाऱ्या  गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र पोलिसांची तात्काळ माफी मागावी. नाहीतर त्यांचे सर्व धंदे पुराव्यासकट बाहेर काढू, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. निलेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी… Continue reading पोलिसांची माफी मागा, अन्यथा सर्व धंदे बाहेर काढू..!

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग : आ. अतुल भातखळकर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांना कुठल्याही प्रकारची माफी अथवा सवलत मिळणार नाही, वीज वापरली असेल तर बिल भरावे लागेल असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज (मंगळवार) स्पष्ट केले. यामुळे सर्व थरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. भाजपाने जोरदार टीका तर केलीच, त्याचबरोबर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग ठराव मांडणार असल्याचा इशारा आ. अतुल… Continue reading ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग : आ. अतुल भातखळकर

तारदाळमध्ये प्रहार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे ना. बच्चू कडू प्रणित प्रहार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन जिल्हाअध्यक्ष जयराज कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान शहर प्रमुख पदी सुनील शिंदे यांच्या सह नूतन शाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष दगडू माने, अनिस मुजावर, विकास गायकवाड, जिल्हा संघटक अक्षय जाधव, दत्ता कोळी अमोल काळे,पन्हाळा तालुका उपाध्यक्ष नझीर… Continue reading तारदाळमध्ये प्रहार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन…

सदाभाऊंच्या क्लिप्स आमच्याकडे : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सदाभाऊ खोत यांच्या कितीतरी क्लिप आमच्याकडे आहेत. मी मेलो तरी शेतकरी संघटना सोडणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही, असे ते त्यामध्ये म्हणाले होते, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. ऐन दिवाळीत दोन दिवसांपासून खोत आणि शेट्टी यांच्यात आरोप- प्रत्यारोपांचे फटके फुटत आहेत. खोत यांच्या आरोपांना उत्तर देताना… Continue reading सदाभाऊंच्या क्लिप्स आमच्याकडे : राजू शेट्टी

जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्यासोबत येणार नाही : सदाभाऊ खोत  

मुंबई (प्रतिनिधी) : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी जोवर जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या संघटनेत परत येणार नाही, असे खोत यांनी म्हटले आहे. खोत यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय आणि ज्या बारामतीला तुम्ही… Continue reading जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्यासोबत येणार नाही : सदाभाऊ खोत  

दादा लाड, पाटील, जगदाळे, निंबाळकर, खोचरे यांची माघार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले शिक्षक नेते दादासाहेब लाड, राज्य कृती समितीचे बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य कायम शाळा विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे, शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मानसिंगराज निंबाळकर आणि इचलकरंजी येथील संभाजीराव खोचरे यांनी उमेदवारी मागे घेतली. कोल्हापुरातील प्रमुख उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून… Continue reading दादा लाड, पाटील, जगदाळे, निंबाळकर, खोचरे यांची माघार

तर व्यापाऱ्यांवर खटला भरू : बाळासाहेब थोरात

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करतानाच महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नवा कायदा तयार करण्याचे संकेत दिले आहेत.शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्र्यांची समिती गठीत केली जाणार आहे.तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली नाही तर त्यांच्यावर खटला दाखल करण्याची तरतूद करण्यात येणार आहे, असे थोरात यांनी आज स्पष्ट केले.… Continue reading तर व्यापाऱ्यांवर खटला भरू : बाळासाहेब थोरात

सदाभाऊंच्या ‘रयत’ची लढण्याआधीच माघार 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे घटक पक्ष असलेले रयत क्रांती संघटनेकडून आमदार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी भरायला लावली होती. पण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर ते लढण्याआधीच आपल्या उमेदवाराची माघार होईल, असे स्पष्ट केले आहे. मी भाजपमध्ये समाधानी आहे, अशीही त्यांनी माध्यमांशी बोलताना सारवासारव केली. मी याचक नाही. बळकट आहे. जिवंत असेपर्यंत… Continue reading सदाभाऊंच्या ‘रयत’ची लढण्याआधीच माघार 

error: Content is protected !!