संजय राऊत जगभरातील १८२ देशांचे राष्ट्रप्रमुख

पुणे (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा  शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.  संजय राऊत जगभरातील १८२ देशांचे राष्ट्रप्रमुख आहेत. इतक्या वर्षानंतर या जगामध्ये राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झालेले नाही.  त्यांच्याकडे तर संपूर्ण जगातल्या विषयावर मत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलणार, अशा खोचक शब्दांत पाटील यांनी त्यांच्यावर… Continue reading संजय राऊत जगभरातील १८२ देशांचे राष्ट्रप्रमुख

महाविकास आघाडी सीमावासीयांच्या पाठिशी : उदय सामंत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासून सीमावासीय १ नोव्हेंबरला मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात काळा दिवस पाळतात. या दिवशी आज बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची कर्नाटक सरकार मुस्कटदाबी करत आहे. म्हणून शिवसेनेसह  महाविकास आघाडी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी ठामपणे उभी राहील,  अशी ग्वाही उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, आज कर्नाटकच्या सीमा… Continue reading महाविकास आघाडी सीमावासीयांच्या पाठिशी : उदय सामंत

तुमच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच बेळगाव महाराष्ट्रात असेल : हसन मुश्रीफ  

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : ‘चंद्रसूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील, अशी दर्पोक्ती करणाऱ्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. ‘चंद्रसूर्याचं कशाला घेऊन बसलात? तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे. संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा… Continue reading तुमच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच बेळगाव महाराष्ट्रात असेल : हसन मुश्रीफ  

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मंत्रिपद, ५० कोटींची ऑफर : काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

भोपाळ (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात विधानसभेच्या २८ जागांवर होत असलेल्या पोट निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापला असताना काँग्रेसच्या नेत्याने भाजपवर आरोप केले आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मंत्रिपदाची आणि ५० कोटी रुपयांची ऑफर ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार उमंग सिंघार यांनी केला आहे. या आरोपानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली… Continue reading भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मंत्रिपद, ५० कोटींची ऑफर : काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

‘एफआरपी’चा निर्णय मान्य, पण ‘ती’ वाढही द्या, अन्यथा… : जालंदर पाटील (व्हिडिओ)

उसउत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य असला तरी ‘ती’ वाढ मिळत नाही, तोवर एकाही कारखान्याचे धुरांडे पेटवू न देण्याचा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते प्रा. जालंदर पाटील यांनी दिला.  

ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी देणार ! : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

उसदराबाबत कोल्हापुरात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत उसउत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.  

परिषदेआधीच ऊस दराची बैठक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊस परिषदेत एफआरपी जाहीर झाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटवू नका, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा इशारा दिल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. उद्या (शनिवार) कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा.… Continue reading परिषदेआधीच ऊस दराची बैठक…

धुरांडी पेटवाल तर गाठ स्वभिमानीशी ! (व्हिडिओ)

यंदाची ऊस परिषद ऑनलाईन होणार आहे. परिषदेत दर निश्चित झाल्यानंतरच कारखाने सुरु करावेत, अन्यथा गाठ स्वभिमानीशी असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.  

राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन ; पण…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आज (शुक्रवार) फोन केला. राज ठाकरेंचा फोन आल्याची माहिती स्वत: शरद पवार यांनी दिली आहे. मात्र, भेटीबाबत काही ठरलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. वाढीव वीज बिले आणि शेतकऱ्यांच्या दूध दराच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी… Continue reading राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन ; पण…

उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेची उमेदवारी? ; संजय राऊत म्हणतात…

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १२ सदस्यांची नियुक्ती राज्यपाल कोट्यातून होणार आहे. यासाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना याबाबत मीदेखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.… Continue reading उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेची उमेदवारी? ; संजय राऊत म्हणतात…

error: Content is protected !!