महापालिकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाच वर्षात महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी आघाडी कार्यरत होती. पण यातील प्रत्येक पक्षाला आपलेच अधिक नगरसेवक निवडून यावेत्, असे वाटते. म्हणून हे तिन्ही पक्ष यावेळी स्वतंत्र लढतील. राष्ट्रवादीचाच झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी कार्यकर्ते हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून राबतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना… Continue reading महापालिकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा..!

कोल्हापूर महापालिकाही भाजपमुक्त करा : मोहम्मद इम्रान प्रतापगढी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून राज्य भाजपमुक्त केले. त्याप्रमाणे आगामी निवडणुकीत कोल्हापूर महापालिकाही भाजपमुक्त करा, असे आवाहन कवी व काँग्रेसचे युवा नेते मोहम्मद इम्रान प्रतापगढी यांनी केले. जगात नद्यांचा संगम झाला आहे. परंतु कोल्हापुरात भिन्न धर्म आणि संस्कृतीचा संगम होतो, असेही ते म्हणाले. कोल्हापूर उत्तरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या संपर्क… Continue reading कोल्हापूर महापालिकाही भाजपमुक्त करा : मोहम्मद इम्रान प्रतापगढी

काँग्रेस नेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे निधन  

सातारा  (प्रतिनिधी) : काँग्रेस  पक्षाचे ज्येष्ठ नेते  व माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने आज (सोमवार) पहाटे निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर आज कऱ्हाड तालुक्‍यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .  त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला जात आहे.   विलासकाका उंडाळकर यांनी १९६२ मध्ये जिल्हा बँकेतून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली.… Continue reading काँग्रेस नेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे निधन  

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आपले सरकार, ठाकरे सरकार’ पुस्तिकेचे प्रकाशन 

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव  ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची कार्य व निर्णय पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी खासदार अनिल देसाई,  खासदार धैर्यशील माने यांची विशेष उपस्थिती होती. विधान परिषद आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या संकल्पनेतून  ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. आजच्या डिजिटल युगात… Continue reading मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आपले सरकार, ठाकरे सरकार’ पुस्तिकेचे प्रकाशन 

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या गावातील बिनविरोध निवडणूक चर्चेला पूर्णविराम…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्याचे प्रवेशद्वार मानल्या गेलेल्या आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांचे गाव असलेल्या यड्राव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आरोग्यमंत्री यड्रावकर यांनी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास ५० लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. सध्या जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आहे. यड्रावकर गट व सतेंद्रराजे नाईक-निंबाळकर यांची युती… Continue reading आरोग्य राज्यमंत्र्यांच्या गावातील बिनविरोध निवडणूक चर्चेला पूर्णविराम…

बावड्यातील ‘पाठबळा’चे श्रेय कुणीही लाटू नये : सुनील जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बावड्यातील जनतेनेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विजयाची सुरवात करून दिली आहे. बावड्यातील जनतेचे क्षीरसागर यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे बावड्यातील जनतेच्या पाठबळाचे श्रेय कोणत्याही नेत्याने घेवू नये, असा पलटवार शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव यांनी केला. कसबा बावडा येथील शिवसेना विभागीय कार्यालयात आयोजित पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.  माजी आमदार… Continue reading बावड्यातील ‘पाठबळा’चे श्रेय कुणीही लाटू नये : सुनील जाधव

महापालिका निवडणूक : पक्ष विरुद्ध आघाडीतच चुरशीचा सामना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेविरोधात भाजप आणि महाडिकांची ताराराणी आघाडी असा चुरशीचा सामना होईल, असे दिसत आहे. यानुसारच प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाले आहे. यामुळे इच्छुकांनी तयारी सुरू… Continue reading महापालिका निवडणूक : पक्ष विरुद्ध आघाडीतच चुरशीचा सामना

‘त्यासाठी’ पंतप्रधानांच्या भेटीची वाट पाहतोय : खा. संभाजीराजे 

नाशिक (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या ओबीसी समाजात भीती निर्माण झाली आहे हे खरे आहे. मात्र, ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी करून पंतप्रधानांच्या भेटीची मी आज देखील वाट पाहतोय, अजून वेळ मिळाला नाही असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी  निराशेचा सूर आळवला. तसेच दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर प्रकाशझोत… Continue reading ‘त्यासाठी’ पंतप्रधानांच्या भेटीची वाट पाहतोय : खा. संभाजीराजे 

यंदा ग्रा.पं.निवडणुकीत सफरचंद, हिरवी मिरची, कंगवा, पांगुळगाड्याची हवा   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निवडणूक मग ती कोणतीही असली तरी महत्त्व असते ते निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या चिन्हाला. प्रत्येक उमेदवार पक्षाचे चिन्ह नसेल तर आपल्या पसंतीचे चिन्ह मिळावे यासाठी धडपडत असतो. पण यावेळी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मजेशीर चिन्हे आयोगाने दिली आहेत. त्याची ग्रामीण भागात चर्चा सुरू आहे. पाव, ब्रेड, सफरचंद, भाज्या, नेलकटर, कंगवा अशा एक ना अनेक… Continue reading यंदा ग्रा.पं.निवडणुकीत सफरचंद, हिरवी मिरची, कंगवा, पांगुळगाड्याची हवा   

आताही केंद्राकडे बोट करू नका : दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये  राजकीय कलगीतुरा रंगला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसने या नामांतराला विरोध केला आहे. यावरून भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.    औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करणे, हा राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट केंद्र… Continue reading आताही केंद्राकडे बोट करू नका : दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा

error: Content is protected !!