नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा…

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा आज (बुधवार) विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सुपूर्द केला.    नाना पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचालींना वेग आला होता. आज (गुरूवार) सह्याद्री अतिथीगृहावर… Continue reading नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा…

अजित पवारांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ : भाजप नेत्याचा सूचक इशारा   

मुंबई (प्रतिनिधी) : अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही आणि ते कधी होणार पण नाहीत. तसेच त्यांना कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते पण आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार, अशी चर्चा आहे, त्यामुळे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली आहे, असा खोचक टोला भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत लगावला… Continue reading अजित पवारांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ : भाजप नेत्याचा सूचक इशारा   

‘गोकुळ’च्या सभेनंतर का संतापले अरुण नरके ? (व्हिडिओ)

‘गोकुळ’च्या सर्वसाधारण सभेनंतर ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी संताप व्यक्त केला.  

महापालिकेच्या १२ प्रभागांच्या रचनेत बदल : प्रशासनाने माहितीच दिली नाही…  

कोल्हापूर (सरदार करले) : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण आणि सोडत पद्धतीने निश्चित केलेल्या ८१ प्रभागांपैकी १२ प्रभागात बदल करण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी प्रभाग निश्चित करून त्याचे गॅॅझेट (२ फेब्रुवारी २०२१) रोजी प्रसिद्ध केले आहे. दोन दिवसानंतरही महापालिका प्रशासनाने त्यासंबंधीची माहिती प्रसिद्धीमाध्यमांना दिलेली नाही. माहिती न देण्याचे कारण काय, असा प्रश्न इच्छुकांकडून… Continue reading महापालिकेच्या १२ प्रभागांच्या रचनेत बदल : प्रशासनाने माहितीच दिली नाही…  

काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद : अजित पवार म्हणाले…

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनंतर आता नव्या पदांची नियुक्ती होत आहे. त्यातच राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद असताना, दुसरे उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले की, अशा बातम्यामध्ये… Continue reading काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद : अजित पवार म्हणाले…

उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे देण्याच्या हालचाली सुरू

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनंतर आता नव्या पदांची नियुक्ती होत आहे. त्यातच राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद असताना, दुसरे उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तर त्यांच्या जागी शिवसेनेच्या नेत्याची वर्णी लागू शकते. त्याबदलत्यात काँग्रेसला… Continue reading उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे देण्याच्या हालचाली सुरू

त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही : शिवेंद्रराजे भोसले

सातारा (प्रतिनिधी) : माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही, अशा शब्दांत साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे नांव न घेता त्यांना जाहीर धमकी दिली आहे. जावळी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिवेंद्रराजे भोसले पुढे म्हणाले की, माझी… Continue reading त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही : शिवेंद्रराजे भोसले

शरजील इस्मानीला पळून जाण्यास ठाकरे सरकारची मदत

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदूविरोधी वक्तव्य करणारा शरजील इस्मानी महाराष्ट्रबाहेर पळून गेला. त्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत  पत्रकार परिषदेत बोलत होते. शेलार म्हणाले की, शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणे याचा अर्थ यांचे डोकं ठिकाणावर आहे का ?… Continue reading शरजील इस्मानीला पळून जाण्यास ठाकरे सरकारची मदत

दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डवर खा. सुप्रिया सुळेंना रोखले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आजचे कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट  घेण्यासाठी पोहोचले. मात्र, या सर्वांना दिल्ली पोलिसांनी या सीमेवरच रोखून धरले आहे. या खासदारांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, केरळमधील अनेक खासदार आहेत. या सर्व खासदारांनी पोलिसांशी… Continue reading दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डवर खा. सुप्रिया सुळेंना रोखले

प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील ४ वाहनांची धडक  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधील रामपूरच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांच्या  वाहनांच्या ताफ्याला अपघात झाला. प्रियंका यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. हा अपघात हापुड महामार्गावर गढमुक्तेश्वरजवळ झाला.  सुदैवाने या अपघातामध्ये प्रियंका  यांना कोणतेही दुखापत झाली नाही.   प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या रामपूरच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यावेळी अचानक प्रियंका गांधी… Continue reading प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील ४ वाहनांची धडक  

error: Content is protected !!