पुन्हा सत्तेत आलो की ‘मराठा आरक्षण’ टिकवून दाखवू ! : चंद्रकांतदादा पाटील (व्हिडिओ)

भाजप सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकवलं. ठाकरे सरकारला ते टिकवता आलं नाही. आम्ही पुन्हा सत्तेत आलो की टिकवूच, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.  

संजय राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नाही ! : चंद्रकांतदादा पाटील (व्हिडिओ)

पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा त्वरित राजीनामा न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारला दिला.  

संजय राठोड यांना अटक करा: भाजप महिला मोर्चाचा रास्ता रोको (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना तत्काळ अटक करून त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी आज (शनिवार) भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने बिनखांबी गणेश मंदिर येथे महिला अध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान, उद्धव ठाकरे… Continue reading संजय राठोड यांना अटक करा: भाजप महिला मोर्चाचा रास्ता रोको (व्हिडिओ)

चित्रा वाघ यांच्या पतीचा कारनामा : काय आहे प्रकरण ?

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. किशोर वाघ हे मुंबईतील परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. ५ जुलै २०१६ रोजी एका प्रकरणात ४ लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित केले होते. या प्रकरणी… Continue reading चित्रा वाघ यांच्या पतीचा कारनामा : काय आहे प्रकरण ?

…तर उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना फाडून खाल्लं असतं : चित्रा वाघ   

नाशिक (प्रतिनिधी) : शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड बलात्कारी असून  त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्याभिचाराचं उदात्तीकरण सुरू आहे. पण, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर नसते. शिवसेनेचे पक्षप्रमुख असते,  तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं,  असे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.  त्या  नाशिक येथे आज (शनिवार) पत्रकार परिषदेत… Continue reading …तर उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना फाडून खाल्लं असतं : चित्रा वाघ   

मास्क नाही घातला ? : राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते,  सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. सरकारमधील मंत्री सगळ्या कार्यक्रमांमध्ये धुडगूस घालू शकतात, शिवजयंतीला तुम्ही नकार देता. मराठी भाषा दिनाला नकार देता. एवढं कोरोनाचे संकट समोर येतंय, असे वाटत असेल, तर सगळ्या जाहीर केलेल्या निवडणुका पुढे ढकला,  अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) येथे केली. मराठी… Continue reading मास्क नाही घातला ? : राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर

संजय राठोड यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या चित्रा वाघ अडचणीत..?

मुंबई  (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर सातत्याने आवाज उठवून  वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. दरम्यान, याआधी किशोर वाघ यांना अटक झाली होती. आता त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे.… Continue reading संजय राठोड यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या चित्रा वाघ अडचणीत..?

संजय राऊत यांच्यावर महिलेकडून गंभीर आरोप

मुंबई  (प्रतिनिधी) : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर एका उच्चशिक्षित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात  तक्रार अर्ज दाखल केला आहे. यात या महिलेने धक्कादायक आरोप केले आहेत. आपल्या मागे माणसं लावणं,  हेरगिरी करणं, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखवणे, यासारख्या आरोपांसह विनयभंग केल्याचाही आरोप या महिलेने केला आहे. सन २०१३ मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून… Continue reading संजय राऊत यांच्यावर महिलेकडून गंभीर आरोप

हरपवडेच्या सरपंच पदी दिनकर चौगले तर उपसरपंच पदी अनिल मोहिते बिनविरोध…

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील हरपवडेच्या सरपंच पदी दिनकर चौगले तर उपसरपंच पदी अनिल मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून बुराण यांनी काम पाहिले. या निवडीनंतर सरपंच आणि उपसरपंच यांचा ग्रामसेवक अवधूत पाटील यांनी सत्कार केला. यावेळी सदस्या वैशाली पाटील, वैशाली चौगले, सुवर्णा चौगले, राणी सुर्यवंशी, गोविंदा चौगले, शिवाजी पाटील, संभाजी चौगले,… Continue reading हरपवडेच्या सरपंच पदी दिनकर चौगले तर उपसरपंच पदी अनिल मोहिते बिनविरोध…

…तर त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं : ना. हसन मुश्रीफ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य विधीमंडळाचे अधिवेशन आलं की कोरोना होतो. हा विरोधी पक्षाचा आरोप चुकीचा आहे. त्यांना जर एवढंच वाटतंय तर त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेत्यांना दिले. ते मुंबईत आज (शुक्रवार) पत्रकारांशी  बोलत होते. अधिवेशन जवळ आले की, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोरोना कसा काय… Continue reading …तर त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं : ना. हसन मुश्रीफ

error: Content is protected !!