टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात १० महिला ठार ; ९ जण गंभीर जखमी

बंगळुरु (प्रतिनिधी) : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला टिपरने धडक दिल्यामुळे धारवाडमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी १७ महिला गोव्याला निघाल्या असताना काळाने घाला घातला. कर्नाटकमध्ये धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. पहाटे ३ वाजताच्या सुमारास टिप्परने टेम्पो ट्रॅव्हलरला… Continue reading टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात १० महिला ठार ; ९ जण गंभीर जखमी

सराईत चोरट्याकडून दोन मोटारसायकली जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना राजवाडा पोलिसांनी आज (गुरुवार) एका सराईत मोटरसायकल चोरट्यास अटक केली. सुहास सदाशिव सटाले (वय ४२, रा. जिवबानाना जाधव पार्क) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ८० हजार रुपयांच्या २ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. एक सराईत मोटरसायकल चोरटा मैलखड्डा परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शोधपथकाला मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा… Continue reading सराईत चोरट्याकडून दोन मोटारसायकली जप्त

कळंबा जेलमध्ये गांजा, मोबाईल फेकणाऱ्या आणखी दोघांना अटक  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये गांजा व मोबाईल फेकणाऱ्या आणखी दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ओंकार उर्फ मुरली दशरथ गेजगे (वय २२, रा. शहापूर, इचलकरंजी, सध्या रा, कळंबा कारागृह) व राजेंद्र महादेव धुमाळ (वय ३०, रा. गणेश कॉलनी, जयसिंगपूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता… Continue reading कळंबा जेलमध्ये गांजा, मोबाईल फेकणाऱ्या आणखी दोघांना अटक  

धनंजय मुंडेंचे प्रकरण पोलिसांना भोवणार..?

मुंबई (प्रतिनिधी) : बलात्कार,  लैंगिक अत्याचार यांसारख्या तक्रारीवर तत्काळ एफआयआर नोंदवून नंतर चौकशी करण्याचे बंधनकारक सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना केले आहे. परंतु राष्ट्रवादीचे नेते व  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात महिलेने केलेल्या बलात्काराच्या  तक्रारीवर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.  त्यामुळे  ही दिरंगाई पोलिसांना भोवण्याची शक्यता आहे.   कोणताही दखलपात्र गुन्हा असेल, तर तत्काळ एफआयआर नोंदवून… Continue reading धनंजय मुंडेंचे प्रकरण पोलिसांना भोवणार..?

अवघ्या २५१ रूपयांमध्ये स्मार्टफोनचे स्वप्न दाखवणाऱ्या उद्योजकाला अटक

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : एका ड्राय फ्रूट घोटाळ्याप्रकरणी उद्योजक मोहीत गोयल आणि त्याच्या साथीदारांना नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. ड्राय फ्रूट बिजनेसच्या नावाखाली देशभरातील विविध शहरात २००  कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. अवघ्या २५१ रूपयांमध्ये जगाला स्मार्टफोनचे स्वप्न दाखवल्याने मोहित चर्चेत आला होता. आता त्याला  अटक झाल्याने  पुन्हा एकदा तो… Continue reading अवघ्या २५१ रूपयांमध्ये स्मार्टफोनचे स्वप्न दाखवणाऱ्या उद्योजकाला अटक

‘आजरा अर्बन’च्या चेअरमनपदी सुरेश डांग तर व्हा. चेअरमनपदी शैलजा टोपले बिनविरोध

आजरा (प्रतिनिधी) : आजरा अर्बन बँकेच्या चेअरमनपदी सुरेश डांग यांची तर व्हा. चेअरमनपदी शैलजा टोपले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज (बुधवार) बँकेच्या मुख्य कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी होते. बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज मल्टिस्टेट कायद्यानुसार झालेल्या… Continue reading ‘आजरा अर्बन’च्या चेअरमनपदी सुरेश डांग तर व्हा. चेअरमनपदी शैलजा टोपले बिनविरोध

ड्रग्सप्रकरणी राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या जावयाला नोटीस

मुंबई (प्रतिनिधी) : खार परिसरातून ड्रग्स बाळगल्याप्रकरणी ब्रिटिश नागरिक करण संजानी आणि राहिल फर्निचरवाला यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून २०० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले होते. आता याच प्रकरणी एनसीबीने राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नोटीस पाठवली आहे. २०० किलो ड्रग्स बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली… Continue reading ड्रग्सप्रकरणी राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या जावयाला नोटीस

गडहिंग्लज येथे ११, १२ वीच्या पुस्तकांची अवैध विक्री करणाऱ्यावर गुन्हा  

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बालभारतीच्या इयत्ता ११  आणि १२ वीच्या पुस्तकांची बालभारतीच्या वेबसाईट वरून पीडीएफ डाऊनलोड करून त्याच्या प्रती विद्यार्थ्यांना विक्री केल्याचा प्रकार आज (बुधवार) उघडकीस आला आहे. याप्रकऱणी प्रसाद कोकीतकर (वय २२, रा. शिप्पुर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बालभारतीचे व्यवस्थापक माणिक पाटील (रा.कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी प्रसाद याच्या दुकानातून झेरॉक्स मशीन व… Continue reading गडहिंग्लज येथे ११, १२ वीच्या पुस्तकांची अवैध विक्री करणाऱ्यावर गुन्हा  

करोडोंचा गंडा घालणाऱ्या व्हिजन अॅग्रोच्या तुकाराम पाटील याला अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  ज्यादा परताव्याच्या अमिष  दाखवून हजारो ठेवीदारांची  करोडो रुपयांची फसवणूक करून फरारी झालेल्या व्हिजन अॅग्रो कंपनीचा संचालक डॉ. तुकाराम शंकर पाटील (वय ४०, रा. माजगाव, ता. पन्हाळा) याला गुन्हे अन्वेषण शाखेने काल (सोमवार) रात्री उशिरा अटक केली. त्याला आज (मंगळवार) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून… Continue reading करोडोंचा गंडा घालणाऱ्या व्हिजन अॅग्रोच्या तुकाराम पाटील याला अटक…

‘घाटगे पाटील’मधील सहा हजार किलो वेस्टेज चोरीस…

करवीर (प्रतिनिधी) : उचगाव (ता. करवीर) येथील घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड या युनिटमध्ये सुमारे एक लाख ९२ हजार रुपये किमतीच्या स्क्रॅप मालाची चोरी झाली असून हे सुमारे ६००० किलोचे चिपिंग (वेस्टेज मटेरियल) आहे. याबाबत घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे सुरक्षा अधिकारी श्रीराम सदाशिव कोडगुले (रा. फुलेवाडी, ता.करवीर) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्यादी दाखल केली आहे.   फिर्यादीत म्हटले… Continue reading ‘घाटगे पाटील’मधील सहा हजार किलो वेस्टेज चोरीस…

error: Content is protected !!