पुणे-बेंगलोर महामार्गावरील अपघातात उजळाईवाडीची महिला ठार

करवीर (प्रतिनिधी) : अज्ञात भरधाव वाहनाने ॲक्टिवा दुचाकीला ठोकर दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. हा अपघात पुणे-बेंगलोर महामार्गावर उचगाव हद्दीतील शिवनेरी हॉटेलनजीक गुरुवारी रात्री उशिरा झाला. उषा विवेक राणे (वय ३३, रा ब्लॉक नंबर ३२ म्हाडा कॉलनी, उजळाईवाडी, ता. करवीर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नांव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा राणे गुरूवारी रात्री तावडे… Continue reading पुणे-बेंगलोर महामार्गावरील अपघातात उजळाईवाडीची महिला ठार

माणेवाडी येथे खैर लाकडाची वाहतूक करणारे वाहन पकडले

रशिवडे (प्रतिनिधी) : धामोड-कोते- माणेवाडी रस्त्यावरून खैर लाकडाची बिगरपास वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले. ही कारवाई कोते पैकी माणेवाडी येथे आज (शुक्रवारी) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. राशिवडे वनरक्षक उमा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी वाहन मालक लहू रामचंद्र माने (रा.कोते पैकी माणेवाडी) आणि लाकूड मालक रामचंद्र साईल (रा.एनारी ता. वैभववाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा… Continue reading माणेवाडी येथे खैर लाकडाची वाहतूक करणारे वाहन पकडले

संदीप मागाडे खूनप्रकरणी आणखी तीन संशयितांना अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कबनूर (ता. हातकणंगले) येथे काही दिवसांपूर्वी राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खूनप्रकरणी आणखी तिघा संशयितांना आज (गुरुवार) शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश नामदेव वडर, मोहसीन इर्शाद सनदी व रमजान इर्शाद सनदी अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता… Continue reading संदीप मागाडे खूनप्रकरणी आणखी तीन संशयितांना अटक

गांजा बाळगल्याप्रकरणी इचलकरंजीतील तरुणाला अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील संभाजीनगर चौकात गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीसांनी एकाला अटक केली आहे. चिन्मय अरूण वेलणकर (वय १९, रा. सातपुते गल्ली, हत्ती चौक, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन हजारांचा २५५ ग्रॅम गांजा, ७५ हजारांची मोपेड असा सुमारे ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, संभाजीनगर चौकात… Continue reading गांजा बाळगल्याप्रकरणी इचलकरंजीतील तरुणाला अटक…

बायको परपुरूषासोबत पळून गेली : नवऱ्याचे १८ महिलांसोबत धक्कादायक कृत्य

हैद्राबाद (वृत्तसंस्था) : बायको परपुरूषासोबत पळून गेल्याचा राग मनात धरून एकाने १८ महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी  बोरबंडा येथील ४५ वर्षीय आरोपी रामुलू याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांने १८ महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बायको… Continue reading बायको परपुरूषासोबत पळून गेली : नवऱ्याचे १८ महिलांसोबत धक्कादायक कृत्य

मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास : अर्णब गोस्वामीला अटक करतील

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांच्या कामाच्या पद्धतीची आम्हाला चांगली माहिती आहे, त्यामुळे योग्य ती कारवाई करुन पोलीस रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब  गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे. अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईतील ९४ पोलीस… Continue reading मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास : अर्णब गोस्वामीला अटक करतील

राजेंद्रनगर येथे जागेच्या वादातून एकाला मारहाण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राजेंद्रनगर येथील दुसऱ्याच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करुन एकाला डोक्यात वीट मारून गंभीर जखमी केले. अरुण नारायण जगदने (वय ५९, रा. राजेंद्रनगर) असे या जखमीचे नाव आहे. या प्रकरणी विश्वनाथ उर्फ बिल्ल्या सौदागर कांबळे, शंकर नागटिळे, देवदास अविनाश सकट सर्व (रा. राजेंद्रनगर) या तिघांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात अरुण जगदने यांनी फिर्याद त्यांनी दिली… Continue reading राजेंद्रनगर येथे जागेच्या वादातून एकाला मारहाण…

पोलिसांचा धाक दाखवत लघुशंकेसाठी थांबलेल्या एकाला लुटले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उमा टॉकीजजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या एका व्यक्तीचा एका अनोळखी इसमाने माझा मित्र पोलीस आहे, असा धाक दाखवत त्याच्याकडून १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हातोहात लंपास केला. याप्रकरणी सत्यजित शिवाजीराव मुळीक (वय ४८, रा. राजारामपुरी १३ वी गल्ली) यांनी एका अनोळखी इसमा विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी,… Continue reading पोलिसांचा धाक दाखवत लघुशंकेसाठी थांबलेल्या एकाला लुटले

बनावट सातबाराप्रकरणी तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मिळकतीचा बनावट ७/१२ उतारा काढून फसवणूक केल्याप्रकरणात न्याय मिळत नसल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन तिघाजणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील महादेव जवाहिरे यांनी यशवंत गणपती भालकर (वय ८० ), मारुती गणपती भालकर (५४), उमाजी यशवंत भालकर (वय ४०) सर्व रा. आरकेनगर रोड पाचगाव या… Continue reading बनावट सातबाराप्रकरणी तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

तब्बल ‘१८’ महिलांची हत्या करणाऱ्या विकृत मारेकऱ्याला अटक…

मुंबई (प्रतिनिधी) : हैदराबादमध्ये १८ महिलांच्या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या ४५ वर्षीय सीरिअल किलरला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलांची हत्या करण्याशिवाय इतर अनेक गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग होता असे पोलिसांनी सांगितलं आहे. त्याला अटक केल्यानंतर नुकतीच हत्या झालेल्या दोन महिलांच्या प्रकरणाचा उलगडाही झाला आहे. या आरोपीने गेल्या २४ वर्षात तब्बल १८ महिलांची हत्या… Continue reading तब्बल ‘१८’ महिलांची हत्या करणाऱ्या विकृत मारेकऱ्याला अटक…

error: Content is protected !!