आ. अनिल परब, सदानंद कदम यांना जामीन मंजूर

दापोली : साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी दापोली न्यायालयाने ठाकरे गटाचे आमदार अनिल परब व सदानंद कदम यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. साई रिसॉर्ट बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याचा या दोघांवर आरोप आहे. त्यात हा जामीन मंजूर झाला आहे. या सुनावणीसाठी हे दोघेही दापोली न्यायालयात हजर होते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या… Continue reading आ. अनिल परब, सदानंद कदम यांना जामीन मंजूर

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाइन डेला होणार आहे. बोर्डावर पहिल्या क्रमांकाचे प्रकरण असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबतचा निर्णयही १४ फेब्रुवारीलाच होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश वाय. एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच… Continue reading महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

सक्तीच्या धर्मांतरणाला राजकीय वळण देऊ नये : सुप्रीम कोर्ट

दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तीच्या, फसव्या धर्मांतरणाच्या प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच हा मुद्दा फक्त एका विशिष्ट राज्याशी निगडीत नाही. देशभरात घडणाऱ्या या घटना चिंतेच्या असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोणत्याही एका राज्याशी संबंध जोडून त्याला राजकीय रंग देण्याची गरज नसल्याचेही सुप्रीम कोर्टाने नमूद केले. सक्तीच्या धर्मांतरणावर चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने यात… Continue reading सक्तीच्या धर्मांतरणाला राजकीय वळण देऊ नये : सुप्रीम कोर्ट

सर्वच धर्मांतारे बेकायदेशीर म्हणता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

दिल्ली (वृतसंस्था) : विवाह किंवा धर्मांतरावर घटनेनुसार कोणतेही बंधन नाही व सर्वच धर्मांतरे बेकायदेशीर म्हणता येणार नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच त्याबाबत माहिती द्यावी असे  न्या. एम. आर. शाह आणि न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालाच्या आव्हान याचिकेवरील या सुनावणी प्रकरणी ७ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.… Continue reading सर्वच धर्मांतारे बेकायदेशीर म्हणता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

नोटबंदीवर आज सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिल्ली (वृतसंस्था) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मोदी सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा योग्यच असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण ५८ याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. … Continue reading नोटबंदीवर आज सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.  देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने १२  डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता.… Continue reading अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मुख्यमंत्री अडचणीत

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरला सुरु आहे. नागपूरचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरण मधील भूखंड प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना एनआयटीमधील भूखंड १६ बिल्डरांना २ कोटी रुपयांना देण्याचे आदेश दिले होते, हे आदेश हायकोर्टाने रद्द केले होते. शिंदे फडणवीस सरकारला… Continue reading अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मुख्यमंत्री अडचणीत

सीमावाद प्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई (प्रतिनिधी) :  कर्नाटक सीमावादप्रकरणी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आक्रमक झाले. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत पेन ड्राईव्हच सादर करत सीमावादावरच्या प्रश्नासंदर्भातली चित्रफित असणारा हा पेन ड्राईव्ह आहे. या पेन ड्राईव्हमध्ये सर्व पुरावे आहेत. यातील फिल्म सर्व आमदारांना दाखवावी असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केले. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असेपर्यंत सीमाभाग केंद्रशासीत करा अशी मागणी उद्धव… Continue reading सीमावाद प्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचे मंत्रिपद अडचणीत

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे आणि फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील गायरानासाठी आरक्षित असलेल्या ३७ एकर जमीन नियमित करण्याच्या आदेशावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सत्तार यांना नोटीस पाठवली आहे. तर सिल्लोड महोत्सवाला आर्थिक मदत करण्यासाठी राज्यभरातून १५ कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश सत्तार यांनी एका बैठकीत दिल्याने खळबळ उडाली… Continue reading कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचे मंत्रिपद अडचणीत

सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची नवी भूमिका

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न सुटावा यासाठी २००४ साली महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च नायायालयात खटला दाखल केला. या खटल्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत दोन्ही राज्यांनी एकमेकांविरुद्ध भूमिका घेऊ नये, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केली. कर्नाटक विधिमंडळात संमत झालेल्या ठरावात सीमाप्रश्न सोडवण्याची जबाबदारी देशाच्या संसदेची असून,  मागील १८ वर्षांपासून… Continue reading सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची नवी भूमिका

error: Content is protected !!