शिवाजी विद्यापीठ वस्तुसंग्रहालय संकुलाचे लोकार्पण

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाने वस्तुसंग्रहालय संकुलाच्या उभारणीतून एका उत्तम कार्याची सुरवात केली आहे. त्याद्वारे कोल्हापूरच्या शाहूकालीन वैभवशाली ऐतिहासिक वारसा लोकांना कायमस्वरुपी पाहण्यास खुला झाला आहे, असे गौरवोद्गार भारत फोर्ज उद्योगसमूहाचे चेअरमन तथा शिवाजी विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी यांनी येथे काढले. शिवाजी विद्यापीठ वस्तुसंग्रहालय संकुलाचे लोकार्पण आज श्री. कल्याणी यांच्या हस्ते आणि राज्याचे उच्च… Continue reading शिवाजी विद्यापीठ वस्तुसंग्रहालय संकुलाचे लोकार्पण

‘आर्किटेक्चर’च्या विद्यार्थ्यांचे डिझाईन स्पर्धेत यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील विद्यार्थ्यांनी आर्किटेक्ट आर. एस. बेरी यांच्या जन्मशताब्दीबद्दल आयोजित डिझाइन स्पर्धेत यश मिळवले. महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या प्रणोती पाटील हिने या स्पर्धेत स्केचिंग कॉम्पिटिशनमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे. सोहम भुरके, शशांक जगदाळे व यश पवार या तीन विद्यार्थांनी इंटिरियर डिझाइन स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक मिळविला आहे.… Continue reading ‘आर्किटेक्चर’च्या विद्यार्थ्यांचे डिझाईन स्पर्धेत यश

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘व्हेरी गुड’ श्रेणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी केलेल्या शैक्षणिक सर्वेक्षणानंतर कसबा बावड्यातील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘व्हेरी गुड’ ही श्रेणी जाहीर झाली. यामुळे या पॉलिटेक्निकची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी दिली. मुंबई येथील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळच्या तज्ज्ञ समितीने डी. वाय. पाटील… Continue reading डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘व्हेरी गुड’ श्रेणी

पुरेसा अनुभव घेतल्याशिवाय व्यवसायात पडू नका : शेफ कान्हेरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हॉस्पिटॅलिटी किंवा हॉटेल व्यवसायात काम करण्यासाठी पुरेसा अनुभव व सातत्यपूर्ण अभ्यास याची गरज असते. केवळ पैसा आहे आणि पदवी मिळवली म्हणून या व्यवसायात पडू नका. पुरेसा अनुभव घेऊनच कोणत्याही व्यवसाय सुरु करा मग यश निश्चितच मिळेल, असा कानमंत्र ख्यातनाम शेफ पराग कान्हेरे यांनी दिला. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या २०२२ मध्ये… Continue reading पुरेसा अनुभव घेतल्याशिवाय व्यवसायात पडू नका : शेफ कान्हेरे

शिवाजी विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांची पीएच.डी. साठी निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील सात विद्यार्थ्यांची दक्षिण कोरियामधील, तर एकाची जपानमधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी निवड झाली आहे. शरद सुनील माने (रा. कोलोली) यांची जपानमधील ओसाका विद्यापीठ (जागतिक क्रमवारी ६८) येथे निवड झाली आहे. जिनेश ललितकुमार चौहान (कोल्हापूर) यांची कोरिया विद्यापीठ, सेऊल (जागतिक क्रमवारी ७४), धनंजय दत्तात्रय कुंभार… Continue reading शिवाजी विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांची पीएच.डी. साठी निवड

डी. वाय. पाटील विद्यापीठाला ऊर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट

कोल्हापूर (प्रतिनिधी): डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीसाठी संशोधित केलेल्या अझेमेट्रिक सॉलिड स्टेट सुपरकॅपेसीटर पद्धतीला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे आठवे पेटंट आहे. रिसर्च डायरेक्टर सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित आणि प्रमाणित केलेल्या या संशोधनासाठी २०२० मध्ये संशोधकांनी पेटंट मिळवण्याबाबत अर्ज केला होता. या शोधाअंतर्गत… Continue reading डी. वाय. पाटील विद्यापीठाला ऊर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट

महावीर अध्यासनात डॉ. महादेव देशमुख यांचा सत्कार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागातील डॉ. महादेव देशमुख यांची विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी निवड झाल्याबद्दल भगवान महावीर अध्यासनामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ जे. एफ. पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन डॉ. देशमुख यांचे अभिनंदन करण्यात आले. डॉ. देशमुख अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, सामाजिक मूल्यांकन, अंतर्गत गुणवत्ता हमी… Continue reading महावीर अध्यासनात डॉ. महादेव देशमुख यांचा सत्कार

लखनौ येथे स्तुति प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ

लखनौ : केंद्र सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुति (सिनरजिस्टिक ट्रेनिंग प्रोग्रॅम अँड टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर) या सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास सोमवारपासून लखनौ येथील डॉ. आंबेडकर केंद्रीय विद्यापीठ येथे प्रारंभ झाला. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून स्तुती हा उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. त्यातील हा पाचवा उपक्रम आहे. स्तुति कार्यक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक… Continue reading लखनौ येथे स्तुति प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ

‘बालकल्याण‘च्या दोन विद्यार्थ्यांची इंजिनिअर होण्याची स्वप्नपूर्ती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या मदतीमुळे बालकल्याण संकुलातील विद्यार्थी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उज्ज्वल भविष्यासाठी गरुडझेप घेऊ इच्छिणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आमदार पाटील यांनी बळ देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. सूरज करवळ आणि… Continue reading ‘बालकल्याण‘च्या दोन विद्यार्थ्यांची इंजिनिअर होण्याची स्वप्नपूर्ती

हणबरवाडी येथील अंध युवक मंचचे मदतीचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अंध कलाकारांचा सहभाग असलेल्या नवरंग वाद्यवृंद शिव हिरा बेंजो पार्टीला आगामी गणेशोत्सव, नवरात्र उत्सवामध्ये कार्यक्रम सादर करण्यास संधी देऊन संस्थेस आर्थिक मदत करण्यास हातभार लावावा, असे आवाहन अंध युवक मंचाच्या वतीने अजय वणकुंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. कोल्हापुरातील हणबरवाडी येथे अंध मुलांसाठी कार्य करणारी अंध युवक मंच ही संस्था २००७ पासून… Continue reading हणबरवाडी येथील अंध युवक मंचचे मदतीचे आवाहन

error: Content is protected !!