विद्यापीठात मानसिक आरोग्य दिनी पोस्टर प्रदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र अधिविभागात जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अधिविभागातील विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन केले. त्याचे उद्घाटन गांधी अभ्यास केंद्र व शारदाबाई पवार अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी केले. डॉ. भारती पाटील म्हणाल्या, समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत आणि मानसशास्त्र विभाग यामध्ये… Continue reading विद्यापीठात मानसिक आरोग्य दिनी पोस्टर प्रदर्शन

पावसाच्या व्यत्ययानंतरही युवा महोत्सव रंगला

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचा ४२ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव पावसाचा व्यत्यय आल्यावरही प्लॅन बी तयार असल्यामुळे सुरळीत पार पडला. गडहिंग्लजमध्ये पहिल्यांदाच डॉ. घाळी कॉलेजमध्ये युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पावसाची शक्यता गृहीत धरून प्लॅन बी तयार असल्यामुळे उद्घाटनाच्या वेळीच पाऊस आल्यानंतरही हा महोत्सव सुरळीत पार पडला. महोत्सवामध्ये लोककला, लोकनृत्य, मूकनाट्य, नकला, वक्तृत्व, वाद्यवृंद, लघुनाटिका,… Continue reading पावसाच्या व्यत्ययानंतरही युवा महोत्सव रंगला

जि. प. शाळा बंद पाडण्याचा घाट हाणून पाडू : ‘आप’चा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळाबाबत माहिती जमा करण्यात येत आहे व त्यांचे समायोजन म्हणजेच त्या शाळा बंद करण्याचे धोरण राज्य सरकार पुन्हा एकदा राबवणार असल्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. याचा सर्वात मोठा दीर्घकालीन फटका ग्रामीण भागातील वंचित, दुर्बल व आदिवासी घटकांना आणि मुख्यत्वे मुलींना बसणार आहे. शाळा बंद… Continue reading जि. प. शाळा बंद पाडण्याचा घाट हाणून पाडू : ‘आप’चा इशारा

‘डी. वाय. इंजिनिअरिंग’मध्ये कॅप’ ऑप्शन फॉर्मबाबत गुरुवारी सेमिनार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था) यांच्यावतीने अभियांत्रिकी प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्थात ‘कॅप’ साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा, याबाबत गुरुवार दि. १३ ऑक्टोबर रोजी मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजता होणाऱ्या या सेमिनारमध्ये डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी… Continue reading ‘डी. वाय. इंजिनिअरिंग’मध्ये कॅप’ ऑप्शन फॉर्मबाबत गुरुवारी सेमिनार

काटेभोगाव येथील किरण सुतार आंतरराज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव येथील किरण  सुतार यांना नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फॉऊडेशन आणि हेल्थ अँड नेचर सोसायटी, बेळगाव यांच्यातर्फे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा असा संयुक्त आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. किरण सुतार हे पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी केंद्रशाळा येथे प्राथमिक शिक्षक व प्रभारी केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक… Continue reading काटेभोगाव येथील किरण सुतार आंतरराज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू होणार : केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती; मात्र आता पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू केली जाणार असल्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझ कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दीपक केसरकर म्हणाले की, सध्या आठवीपर्यंत परीक्षा घेतल्या जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता… Continue reading पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू होणार : केसरकर

कळे येथे एन.एम.एम.एस. परीक्षा शिक्षकांसाठी कार्यशाळा

कळे (प्रतिनिधी) : कळे-पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील शाळांतील बुध्दिमत्ता, गणित व विज्ञान शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी झालेल्या कार्यशाळेचे उद्घाटन पन्हाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. एम. मानकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेत पन्हाळा-गगनबावडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व जि.प. च्या शिक्षण विभागातर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले… Continue reading कळे येथे एन.एम.एम.एस. परीक्षा शिक्षकांसाठी कार्यशाळा

कळे विद्यामंदिरमध्ये ‘आई’ भित्तीपत्रकाचे अनावरण

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा एज्युकेशन सोसायटी संचलित कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेत समाजशास्त्र विषयाच्या ‘आई’ या भित्तीपत्रकाचे अनावरण महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा  मुख्याध्यापक संघाचे सहसचिव अजित रणदिवे, संचालक श्रीकांत पाटील, कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे  प्राचार्य एस. जी.… Continue reading कळे विद्यामंदिरमध्ये ‘आई’ भित्तीपत्रकाचे अनावरण

शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वाणी’ला ५० दिवस पूर्ण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि जनसंपर्क कक्षामार्फत निर्मित ‘शिव-वाणी’ या यू-ट्यूब ध्वनीवाहिनीस नुकतेच ५० दिवस पूर्ण झाले. कोल्हापूर, सांगली व सातारा या विद्यापीठ कार्यक्षेत्रासह राज्यभरात स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना’ या ध्वनीमालिकेनेही  ५० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के… Continue reading शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वाणी’ला ५० दिवस पूर्ण

शरद इंजिनिअरिंगमध्ये शनिवारी इम्पेटस टेक्निकल स्पर्धा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शनिवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी इम्पेटस या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. आय.एस.टी.ई., नवी दिल्ली अंतर्गत स्टुडंट चॅप्टर व शरद इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये पेपर प्रेझेन्टेशन, रोबो रेस यासह १५ पेक्षा अधिक स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील… Continue reading शरद इंजिनिअरिंगमध्ये शनिवारी इम्पेटस टेक्निकल स्पर्धा

error: Content is protected !!