समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : १३ परप्रांतीय मजुरांचा मृत्यू

बुलडाणा (प्रतिनिधी) : लोखंडी सळ्या घेऊन जात असलेला टिप्पर उलटून झालेल्या भीषण अपघातात १३ परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवार) दुपारी सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड गावानजीक तडेगाव फाट्याजवळ घडला. तीन मजुरांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. समृद्धी  महामार्गाच्या कामावर दुसरबीड येथून मजूर घेऊन हा टिप्पर चालला होता. तडेगाव फाट्याजवळ… Continue reading समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : १३ परप्रांतीय मजुरांचा मृत्यू

मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : विनायक मेटे

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात निर्णय घेतले. त्यांची समितीतून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करीत चव्हाण यांना ‘विश्वासघातकी’ हा पुरस्कार दिला जाणार असल्याचा टोला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी लगावला. तसेच मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. ते आज… Continue reading मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : विनायक मेटे

राणेंच्या अभिवादनानंतर शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण : भाजप संतप्त

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. त्यांनी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं. मात्र, नारायण राणे या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तिथे शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं दूध, गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं आहे. यावरून भाजप नेते संतप्त झाले असून खरे तर शिवसेनेचे शुद्धीकरण… Continue reading राणेंच्या अभिवादनानंतर शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण : भाजप संतप्त

‘ई-पीक पाहणी’ ॲपवर शेतकऱ्यांनी पिक स्थितीची नोंद करावी : महसूल विभागाचे आवाहन…

मुंबई / राशिवडे (प्रतिनिधी) : पीक पेरणीबाबतची माहिती गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम राबविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने १५ ऑगस्टपासून सुरु केली आहे. पीक पेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्यासाठी आणि पीक विमा, पीक पाहणी दावे निकालात काढण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हे ॲप विकसित करण्यात… Continue reading ‘ई-पीक पाहणी’ ॲपवर शेतकऱ्यांनी पिक स्थितीची नोंद करावी : महसूल विभागाचे आवाहन…

…तोपर्यंत मी इडीसमोर चौकशीला जाणार नाही !

मुंबई (प्रतिनिधी) : न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी इडीच्या चौकशीला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीने ५ वेळा समन्स बजावले आहेत. पाचव्यांदा समन्स बजावल्यानंतरही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. ते चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी… Continue reading …तोपर्यंत मी इडीसमोर चौकशीला जाणार नाही !

…अन्यथा, मराठा समाजाचा उद्रेक कोणी रोखू शकणार नाही ! : खा. उदयनराजे

सातारा (प्रतिनिधी) : राज्य सरकारने आता मराठा समाजाला भूलथापा देणे बंद करावे. केंद्राकडे बोट न दाखवता मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रत्यक्ष कृती सुरू करावी, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक कोणीही रोखू शकणार नाही, अशा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. या संदर्भात उदयनराजे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. उदयनराजे यांनी या… Continue reading …अन्यथा, मराठा समाजाचा उद्रेक कोणी रोखू शकणार नाही ! : खा. उदयनराजे

पूरबाधित व्यावसायिकांना अत्यल्प व्याजदराने मिळणार कर्ज…

मुंबई (प्रतिनिधी) : पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना राज्य सरकारने ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी अत्यंत कमी म्हणजे ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आज (बुधवार) उपमुख्यमंत्री… Continue reading पूरबाधित व्यावसायिकांना अत्यल्प व्याजदराने मिळणार कर्ज…

तीन वर्षांनंतर हायकोर्टाचा ‘डीएसके’ समूहाला दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या खटल्यामध्ये त्यांची पत्नी हेमंती यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयामध्ये वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी या प्रकरणामध्ये कुलकर्णी यांची बाजू मांडली.  या निर्णयामुळे तब्बल तीन वर्षानंतर डीएसके’ समूहाला दिलासा मिळाला आहे. कुलकर्णी कुटुंबातील अनेकांना २०१८… Continue reading तीन वर्षांनंतर हायकोर्टाचा ‘डीएसके’ समूहाला दिलासा

अनिल देशमुख यांना इडीचे पाचव्यांदा समन्स…

मुंबई (प्रतिनिधी) : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीच्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावं, याची मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, सोमवारी न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानंतर आता ईडीनं पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. ईडीनं अनिल देशमुख यांना बजावलेलं हे पाचवं समन्स आहे. ईडीनं त्यांना बुधवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहावे, असे समन्स… Continue reading अनिल देशमुख यांना इडीचे पाचव्यांदा समन्स…

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स रात्री १० पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी आटोक्यात असल्याने १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल्स देखील रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली… Continue reading राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स रात्री १० पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी…

error: Content is protected !!