राज्यपालांचे वक्तव्य दाबण्यासाठी राऊत यांना अटक

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वादळ उठले होते. या वादावरील सर्वांचे लक्ष हटविण्यासाठीच शिवसेना खासदार संजय राऊत यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली, असा दावा शिवसेनेने केला आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते; पण गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी… Continue reading राज्यपालांचे वक्तव्य दाबण्यासाठी राऊत यांना अटक

मराठी माणसाला कमी लेखण्याचा हेतू नव्हता : कोश्यारी

मुंबई (प्रतिनिधी) : ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. शुक्रवारी राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले, त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या… Continue reading मराठी माणसाला कमी लेखण्याचा हेतू नव्हता : कोश्यारी

राज्यपालांनी जनतेची माफी मागावी : नाना पटोले

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याने राज्यभरात मोठा गदारोळ माजला आहे. विविध क्षेत्रांतून त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. मुंबईतून गुजराती, राजस्थानी निघून गेले, तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान कोश्यारी यांनी केले होते. यासंदर्भात आता कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी ट्वीट करत राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. यात… Continue reading राज्यपालांनी जनतेची माफी मागावी : नाना पटोले

राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आलीय : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे तूप पाहिले; पण कोल्हापूरचा जोडा पाहिला नाही. त्यामुळे लवकरच त्यांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जहरी टीका केली आहे. मुंबईत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी… Continue reading राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आलीय : उद्धव ठाकरे

राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही : फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी केलेल्या वादग्रस्त विधानापासून फारकत घेतली आहे. ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये व वाटचालीमध्ये मराठी माणसांचे जे कार्य व श्रेय आहे, ते सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रासह जगभरात मराठी माणसांचे नाव मोठे आहे,’ असे ते म्हणाले. ‘राज्याच्या विकासातील वेगवेगळ्या समाजाचे योगदान… Continue reading राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही : फडणवीस

राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गट केंद्राकडे तक्रार करणार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबईतून जर गुजराथी आणि राजस्थानी समाज निघून गेला तर मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळख पुसली जाईल, मुंबईकडे पैसाच उरणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होते आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर… Continue reading राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गट केंद्राकडे तक्रार करणार

डाके, जोशी यांच्याकडून शिवसैनिकांची निष्ठा शिकावी : राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांच्याकडून कडवट शिवसैनिकांची निष्ठा शिकून घ्यावी, असा सल्ला शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि लीलाधर डाके यांची भेट घेतली. या भेटीवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना खोचक सल्ला दिला आहे. डाके आणि जोशी हे… Continue reading डाके, जोशी यांच्याकडून शिवसैनिकांची निष्ठा शिकावी : राऊत

संजय राऊत यांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) :  सत्तांतराचे स्वप्न संजय राऊतांना पाहू द्या. ते नेहमी स्वप्ने पाहत असतात. राज्यात १६६ लोकांचे सरकार असून, लोकसभेत १२ लोकांनी सभापतींना पत्र दिले आहे. दोन्ही सदनात आमच्याकडे दोन तृतीयांश संख्याबळ असल्यामुळे पूर्णपणे आमचे सरकार मजबूत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खा. संजय राऊतांना लगावलाय. यावेळी शिंदे यांनी लिलाधर डाके यांची भेट घेतली.… Continue reading संजय राऊत यांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या : मुख्यमंत्री

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न चिन्ह

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारास दिल्लीतून हिरवा कंदिल अद्याप मिळालेला नाही. यामुळे विस्तार जुलै अखेर ही होणार का? यावर प्रश्न चिन्ह उपस्थितीत झाले आहे. न्यायालयांनी प्रक्रिया स्पष्टता अधिक झाल्यावर विस्तार करावा, असे मत दिल्ली भाजपा नेत्यांचे आहे. न्यायालयाकडून स्पष्टता आल्यानंतरच विस्ताराचा मुहूर्त निघू शकतो, असे सांगण्यात येत आहे.  मंत्रिमंडळ विस्तारात भाजप हायकमांडकडून राज्यातील काही वरिष्ठ… Continue reading राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न चिन्ह

मुख्यमंत्र्यांचे निर्णय दिल्लीत; आपण काय करणार? : अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करणार आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे निर्णय दिल्लीत होतात, त्याला आपण काय करणार, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदेंवर केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे. अजित… Continue reading मुख्यमंत्र्यांचे निर्णय दिल्लीत; आपण काय करणार? : अजित पवार

error: Content is protected !!