आरेमध्ये कारशेडच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा : अमित ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा शिंदे सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकले होते. आपल्याला विकास हवाच आहे; पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. त्यामुळे मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी आग्रहाची विनंती राज ठाकरे यांचे… Continue reading आरेमध्ये कारशेडच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा : अमित ठाकरे

तुरुंगात मारहाण, विनयभंग झाल्याचा केतकी चितळेचा दावा

मुंबई (प्रातिनिधी) : तुरुंगात आपला विनयभंग आणि मारहाण झाल्याचा दावा मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी १५ मे रोजी अटक केली होती, तर २२ जून रोजी तिची जामिनावर सुटका करण्यात आली. तिने आपली अटक बेकायदेशीर असल्याचेही म्हटले आहे. अभिनेत्री चितळे… Continue reading तुरुंगात मारहाण, विनयभंग झाल्याचा केतकी चितळेचा दावा

फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणणे जड जातंय : राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणणे मला अजूनही जड जात आहे.’ असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडून अनपेक्षितरीत्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, तर दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सहभागी होण्यास त्यांच्याच केंद्रीय नेतृत्वाने भाग पाडले. ज्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये… Continue reading फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणणे जड जातंय : राऊत

विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकर, साळवी रिंगणात

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांनी, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी  आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांची नावे घोषित झाल्याने चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार राजन साळवी यांचा… Continue reading विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकर, साळवी रिंगणात

एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील सर्व पदांवरून हकालपट्टी

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेत एकनाथ शिंदे यांच्यावर वर मोठी कारवाई… Continue reading एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील सर्व पदांवरून हकालपट्टी

राज ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांचे कौतुक

मुंबई (प्रतिनिधी) : आत्ताचे सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतके असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतली. आपल खरोखर अभिनंदन, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दु:खावर फुंकर मारली आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरुन कौतुक करत त्यांच्यासाठी खास… Continue reading राज ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांचे कौतुक

कनिष्ठपद भूषवणारे फडणवीस पाचवे मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सत्तासंघर्ष आता मिटला आहे. फडणवीसांनी नाट्यमय घडामोडीनंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपद भूषवूनसुद्धा उपमुख्यमंत्रीसारखे कनिष्ठपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस हे पाचवे मुख्यमंत्री ठरले आहेत. दरम्यान, फडणवीस यांच्याआधी चार नेत्यांनी कनिष्ठपद भूषवले आहे. काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण हे १९७५  मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि वसंतदादा पाटील यांच्या जागी दोन वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले.… Continue reading कनिष्ठपद भूषवणारे फडणवीस पाचवे मुख्यमंत्री

…तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या वेळी अडीच अडीच वर्षे हेच ठरले होते. आता मग हे सगळे करण्याचं कारण काय? हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.… Continue reading …तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता : उद्धव ठाकरे

यंदा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

मुंबई (प्रतिनिधी) : पंढरपूर येथे यंदा आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची महापूजा करण्याचा बहुमान महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी झाली नव्हती. इंग्रजांच्या काळात विठ्ठलाच्या महापूजेची परंपरा होती. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करत होते. महापूजेसाठी विठ्ठल मंदिराला ब्रिटिशांकडून दोन हजार रुपयांचे वार्षिक… Continue reading यंदा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

विधानसभा अध्यक्षपदी विखे-पाटील?

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यपालांकडून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्यात आले असून, राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजप आमदारांची आज (शुक्रवारी) संध्याकाळी पाच वाजता बैठक देखील होणार आहे. या बैठकीत राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या… Continue reading विधानसभा अध्यक्षपदी विखे-पाटील?

error: Content is protected !!