पूरकाळात जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलेल्या नियोजनामुळे मागील वर्षी जुलैमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीत जीवितहानी टाळणे शक्य झाले. यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण झाली तर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वेळोवेळी बैठका घेवून संबंधित सर्व प्रशासकीय विभागांना… Continue reading पूरकाळात जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन

कुरुंदवाडमध्ये आचारसंहितेपूर्वी विकासकामांवर भर

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी विकासकामांवर भर दिली आहे. शहरातील रस्ते, गटारी, हायमास्ट दिवे आदी मंजूर झालेल्या विकासकामांच्या वर्क ऑर्डर दिल्याने ठिकठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. काही कामांना लवकरच सुरवात होणार आहे. शहरातील रस्त्यावरून अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या. प्रशासकराज आल्यानंतर मुख्याधिकारी जाधव यांनी रस्ते दुरुस्तीची… Continue reading कुरुंदवाडमध्ये आचारसंहितेपूर्वी विकासकामांवर भर

संजय गांधी निराधार समिती अध्यक्षपदी विलास पाटील

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी सावर्डे तर्फ असंडोली, ता. पन्हाळा येथील विलास गणपती पाटील यांची निवड करण्यात आली. यासाठी काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील, करवीरचे आमदर पी. एन. पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी. जि.प. सदस्य बाळासाहेब मोळे यांचे सहकार्य लाभले. यावेळी करवीरचे आ. पी. एन. पाटील यांनी प्रथमच हे… Continue reading संजय गांधी निराधार समिती अध्यक्षपदी विलास पाटील

कुरुंदवाड पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : येथील नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे. आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. येथील पालिकेच्या तबक मैदानातील जिम्नॅशियम हॉल येथे आज (सोमवार) सकाळी ११ वाजता प्रभाग आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष सभा बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी… Continue reading कुरुंदवाड पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत

कुरुंदवाडमध्ये १३ जूनला प्रभागांचे आरक्षण सोडत काढणार : मुख्याधिकारी

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडकर यांच्या उपस्थितीत तबक मैदानातील जिम्नॅशियम हॉल येथे सोमवारी १३ जूनला सोडत निघणार आहे. ओबीसी आरक्षण वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत निघणार असल्याची माहिती… Continue reading कुरुंदवाडमध्ये १३ जूनला प्रभागांचे आरक्षण सोडत काढणार : मुख्याधिकारी

वीर शिवा काशीद समाधी स्थळाची आधिकऱ्यांकडून पाहणी.

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वीर शिवा काशीद स्मारक समाधी स्थळाचे भूस्खलन-अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. आमदार विनय कोरे यांनी विशेष संकल्पना राबवून येथील स्मारक स्थळाचे कायापालट सुशोभीकरण काम हाती घेतले आहे. आमदार कोरे यांनी येथील विकासासाठी तीस लाखांचा निधी मंजूर करून दिला आहे. हा निधी खर्च करण्याकामी प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या… Continue reading वीर शिवा काशीद समाधी स्थळाची आधिकऱ्यांकडून पाहणी.

…तर महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर : विजय वडेट्टीवार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापासून कोरोना आजाराने पुन्हा एकदा उचल खाल्ली असल्याचे चित्र दिसून येत आहे. जर कोरोनाची रुग्ण संख्या वाढत राहिली तर याचा परिणाम महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीवर होऊ शकतो असे विधान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वांनाच बसला होता. त्यानंतर हळूहळू हि रुग्णसंख्या… Continue reading …तर महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर : विजय वडेट्टीवार

बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी. यासाठी अभियंते व बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचना  पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या. ते अभियंते व बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत झालेल्या बैठकीमध्ये बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांची निर्गती तातडीने झाल्यास शहर व जिल्ह्यातील विकास कामे गतीने होतील. नगररचना,… Continue reading बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी : पालकमंत्री

कुरुंदवाड शहरातील विकासकामांना १५ दिवसांत सुरुवात : निखिल जाधव 

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरूंदवाड शहरातील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विकास कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामांची वर्क ऑर्डर काढून १५ दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली. जाधव… Continue reading कुरुंदवाड शहरातील विकासकामांना १५ दिवसांत सुरुवात : निखिल जाधव 

राज्यातील दुकाने, आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत बंधनकारक : मंत्रीमंडळाचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय आज (बुधवार) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य मंत्रीही उपस्थित होते. या बैठकीत कामगार संख्या दहापेक्षा कमी असलेल्या आस्थापना, तसेच दहापेक्षा अधिक… Continue reading राज्यातील दुकाने, आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत बंधनकारक : मंत्रीमंडळाचा निर्णय

error: Content is protected !!