‘सुमंगलम’ पंचमहाभूत महोत्सव तयारीला वेग! मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

अग्नि, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पाच पंचमहाभूतांच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी पंचभौतिक महोत्सवाचे आयोजन कणेरी मठावर करण्यात आले आहे. २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव पार पडणार असून या या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक मंत्रालयात पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ही बैठक पार पडली असून… Continue reading ‘सुमंगलम’ पंचमहाभूत महोत्सव तयारीला वेग! मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

कोल्हापूरला फुलांचे शहर बनवूया : संजय शिंदे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात जी उद्याने आहेत, त्या सर्वांना महापालिका, गार्डन क्लब आणि नागरिकांच्या समन्वयातून विकसित करूया तसेच कोल्हापूरला फुलांचे शहर बनवूया, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. महापालिका व गार्डन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर उद्यानामध्ये भव्य पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप… Continue reading कोल्हापूरला फुलांचे शहर बनवूया : संजय शिंदे

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या ४८ तासांत कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. बहुतांश भागात ढगाळ हवामानामुळे ऐन हिवाळ्यात उकाडा, इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात दोन दिवसांपासून थंडी जाणवत असली तरी दुपारी उकाडा होताना दिसत आहे. वातावरणात होणाऱ्या झपाट्याच्या बदलांमुळे जनजीवनावर प्रचंड परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, बदलत्या हवामानामुळे रबी पीकही धोक्यात आले आहे. बंगालच्या… Continue reading कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

मसाई पठार संरक्षित क्षेत्र घोषित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऐतिहासिक किल्ले पन्हाळागडाजवळील मसाई पठार क्षेत्र ‘संवर्धित राखीव क्षेत्र’ म्हणून वनविभागाने आज जाहीर केले. त्यामुळे मसाई पठार परिसरातील आकर्षक फुलझाडीसह वन्यजीवांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. या सोबत शाहूवाडी तालुक्यातील बेरवाडी व खोतवाडी येथील क्षेत्र याच संवर्धन क्षेत्रात राखीव झाले आहे. तसा आदेश वनविभागाने काढल्यामुळे जिल्ह्यातील संवेदनशील वनक्षेत्र व वनसंपदा अबाधित राहण्यास… Continue reading मसाई पठार संरक्षित क्षेत्र घोषित

जे जे रुग्णालयात सापडला रहस्यमय बोगदा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटलच्या खाली बोगद्याचा शोध लागल्याची बातमी खरेतर चर्चचा विषय बनली आहे. सर्वत्र या बातमीमुळे खळबळ उडाली आणि या बोगद्यामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी प्रत्येकामध्ये उत्सुक्ता लागून राहिली आहे. येथील डॉक्टर हे रुग्णालयाच्या आवारात फिरत असताना त्यांना एका भिंतीला बोगदा असल्याचे दिसले. ही घटना मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयातील आहे. हा सापडलेला बोगदा हा… Continue reading जे जे रुग्णालयात सापडला रहस्यमय बोगदा

हिमनद्यांचे अस्तित्व धोक्यात, युनेस्कोने दिला इशारा

दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील काही प्रमुख हिमनद्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती आहे. संयुक्त राष्ट्रांची सांस्कृतिक संस्था युनेस्कोच्या रिपोर्टनुसार, ‘ग्लोबल वॉर्मिंगमुळे बहुतांश हिमनद्यांचे अस्तित्व २०५० सालापर्यंत संपेल. यामध्ये इटलीतील डोलोमाइट्स, अमेरिकेतील योसेमाइट आणि यलोस्टोन पार्क, टांझानियामधील माऊंट किलीमांजेरो यांचा समावेश आहे. ‘युनेस्को सुमारे १८,६०० हिमनद्यांचे निरीक्षण करते. युनेस्कोने म्हटले आहे की, २०५० जागतिक तापमान… Continue reading हिमनद्यांचे अस्तित्व धोक्यात, युनेस्कोने दिला इशारा

error: Content is protected !!