राज्यकारभार थांबता कामा नये : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत म्हणाले. जनतेशी संबंधित महत्वाची कामे… Continue reading राज्यकारभार थांबता कामा नये : मुख्यमंत्री ठाकरे

राजर्षी छत्रपती शाहू, आचार्य अत्रे पुरस्काराचे उद्या वितरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या जि. प. आणि पं. स. सदस्य व कर्मचारी यांना दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार व आचार्य अत्रे सर्वोकृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण रविवार, दि. २६ जून रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, पालकमंत्री… Continue reading राजर्षी छत्रपती शाहू, आचार्य अत्रे पुरस्काराचे उद्या वितरण

राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. मागील काही काळापासून हीप बोन या आजाराने त्रस्त आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर… Continue reading राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

तेरणी येथे सीआरपीएफमधील सविता नाईकचा सत्कार

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ते आपले क्षेत्र नव्हे म्हणून बाजूला न होता आलेल्या संधीचे सोने करीत मोठया धाडसाने केंद्रीय पोलीस दल तथा सीआरपीएफ हे क्षेत्र निवडले व त्याचे यशस्वी ट्रेनिंग पूर्ण केल्याबद्दल तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील सुकन्या सविता कल्लापा नाईक हिचा संगमेश्वर विकास सेवा संस्था व बसवेश्वर दूध संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तेरणीचे शेतकरी अरुणराव… Continue reading तेरणी येथे सीआरपीएफमधील सविता नाईकचा सत्कार

आषाढीवारीत विविध सुविधांसाठी ९.३२ कोटींचा निधी : मुश्रीफ

मुंबई (प्रतिनिधी) : पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी २ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपयांचा, तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी ६ कोटी ७३ लाख २० हजार रुपये असा एकूण ९.३२ कोटींहून अधिक निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी… Continue reading आषाढीवारीत विविध सुविधांसाठी ९.३२ कोटींचा निधी : मुश्रीफ

अग्निपथ’ योजना रद्द होणार नाही, तिन्ही सेना दलाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने जाहीर केलेली ‘अग्निपथ’ योजना रद्द होणार नसून लवकरच या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली आहे. भरती अगोदर युवकांना हिंसा आणि तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असल्याचेही लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले. तिन्हीही सेना दलाच्या वतीने रविवारी संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.… Continue reading अग्निपथ’ योजना रद्द होणार नाही, तिन्ही सेना दलाचे स्पष्टीकरण

वारकरी महिलांसाठी आरोग्यवारी उपक्रम

पुणे (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीत मोठा खंड पडला होता. आता कोरोनाचा संसर्ग आवाक्यात आल्याने राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. २१ जून रोजी पालखी सोहळ्याला सुरुवात होत आहे. या सोहळ्यानिमित्त राज्य महिला आयोगाच्या वतीने वारकरी महिलांसाठी आरोग्यवारी उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.… Continue reading वारकरी महिलांसाठी आरोग्यवारी उपक्रम

‘जलजीवन मिशन’ १५३४ कामांना मंजुरी : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला जलजीवन मिशन कार्यक्रम सध्या राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हयात जलजीवन मिशनचे काम वेगाने सुरू असून, जिल्हयात एकूण १ हजार ५३४ योजनांचा ९२१ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याला मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘हर घर, नलसे जल’… Continue reading ‘जलजीवन मिशन’ १५३४ कामांना मंजुरी : पालकमंत्री सतेज पाटील

गांधीनगरसह १३ गावांसाठी नळपाणी योजनेस मान्यता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गांधीनगरसह १३ गावांसाठीच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेच्या ३४४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे आता या गावांमधील प्रत्येक घरास नळ जोडणी करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला असल्याची माहिती कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. गांधीनगरसह १३ गावे यासाठीच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी… Continue reading गांधीनगरसह १३ गावांसाठी नळपाणी योजनेस मान्यता

आपत्ती काळासाठी दोन हजार स्वयंसेवक सज्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजार स्वयंसेवकांचे जाळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयार ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. पोलीस सेवा संघटनेबरोबरच इतर ७ स्वयंसेवी संस्थेचे एकूण २ हजार ७० स्वयंसेवक कार्यरत आहेत. जिल्ह्यात कार्यरत आपदामित्रांना मदत आणि बचावकार्याचे दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले आहे. जिल्हा प्रशासनाकडे… Continue reading आपत्ती काळासाठी दोन हजार स्वयंसेवक सज्ज

error: Content is protected !!