पन्हाळा तालुक्यात जि.प., पं. स.चे प्रभाग आरक्षण कायम

कोतोली (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पन्हाळा तालुक्यात निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या प्रभाग आरक्षणावर तालुक्यातून सहा हरकती दाखल करण्यात आल्या होत्या; मात्र या सर्व हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावत निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभाग आरक्षण कायम ठेवले. पूर्वी असणाऱ्या पाच जि. प. मतदारसंघात नवीन दोन मतदार संघ,… Continue reading पन्हाळा तालुक्यात जि.प., पं. स.चे प्रभाग आरक्षण कायम

अखेर इचलकरंजी महापालिका अस्तित्वात

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी महापालिकेच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. इचलकरंजी ही राज्यातील २८ वी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी महापालिका आहे. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. महापालिका करण्यासाठी सर्व पक्षीय मंडळींनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे महापालिका करण्याच्या प्रक्रियेत राजकीय अडथळा आला नाही. महापालिका करण्याबाबतचा आदेश गुरुवारी नगरविकास विभागाने जारी केला आहे.… Continue reading अखेर इचलकरंजी महापालिका अस्तित्वात

औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतराचा प्रस्ताव मंजूर

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबादसह नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचे प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवले गेली. या प्रस्तावाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे ‘धाराशीव’ असे नामकरण होणार आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील हे नाव आता देण्यात येणार आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर… Continue reading औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतराचा प्रस्ताव मंजूर

भादवणमध्ये २७ वर्षांनंतर घरासह शेतीचा वाद संपुष्टात

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील भादवण येथील गुंडू कदम यांच्या वडिलोपार्जित असणाऱ्या जमिनीच्या व घराच्या वाटणीवरून २७ वर्षे न्यायालयात वाद-विवाद सुरू होते. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अनेक वर्षे गेल्याने व तंटामुक्त समितीने हा वाद संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. २७  वर्षे असणारा हा वाद संपुष्टात आणण्यासाठी तंटामुक्त समितीला यश आले. गावातील तंटा गावात मिटावा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान… Continue reading भादवणमध्ये २७ वर्षांनंतर घरासह शेतीचा वाद संपुष्टात

प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील त्रुटी दूर करणार : मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या शासन निर्णयात काही त्रुटी आहेत. त्या दूर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान मिळेल यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या अनुदानासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासह ७७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये बढती, कर्मचारी पगार फरकापोटी पावणे अकरा कोटी रुपये देणे,… Continue reading प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील त्रुटी दूर करणार : मुश्रीफ

कोल्हापुरात नवउद्योजकांसाठी उद्या मार्गदर्शन कार्यक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने महासैनिक दरबार हॉल, लाईन बाजार कोल्हापूर येथे बुधवार, दि. २९ जून रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम’ आयोजित केला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास… Continue reading कोल्हापुरात नवउद्योजकांसाठी उद्या मार्गदर्शन कार्यक्रम

टिपर कर्मचाऱ्यांचा पगार जमा, ‘आप’च्या शिष्टाईला यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील कचरा उठाव करण्याचे काम करणाऱ्या टिपर कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाल्याने कचरा उठाव पूर्ववत सुरू झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या यशस्वी शिष्टाईला यश आले आहे. कचरा उठाव करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करणाऱ्या टिपर चालकांचा मे महिन्याचा पगार न झाल्याने चालकांनी काम बंद केले होते. या चालकांनी आम आदमी पार्टीच्या… Continue reading टिपर कर्मचाऱ्यांचा पगार जमा, ‘आप’च्या शिष्टाईला यश

शाहू आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील : प्राचार्य माने

गारगोटी (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास भुदरगड तालुका शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस. माने यांनी व्यक्त केला. ‘कोजिमाशि’ निवडणुकीसाठी राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचा भुदरगड तालुका प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी सोहळ्यात प्राचार्य माने बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘कोजिमाशि’चे संचालक एस. एम.पाटील होते. एस. एम.पाटील यांनी आमदार जयंत… Continue reading शाहू आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील : प्राचार्य माने

ग्रामसचिवालय बांधकामास निधी कमी पडणार नाही : आ. आवळे

कुंभोज (वार्ताहर) : कुंभोज ग्रामसचिवालयाच्या बांधकामासाठी कोणत्याही स्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही. शिवाय बायपास रस्त्याच्या मुरमीकरण, डांबरीकरणासाठी शासन दरबारी प्रयत्न करून लवकर फंड उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूबाबा आवळे यांनी दिले. महात्मा फुले सूतगिरणी पेठवडगाव येथे कुंभोज महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुंभोजच्या… Continue reading ग्रामसचिवालय बांधकामास निधी कमी पडणार नाही : आ. आवळे

राज्यकारभार थांबता कामा नये : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत म्हणाले. जनतेशी संबंधित महत्वाची कामे… Continue reading राज्यकारभार थांबता कामा नये : मुख्यमंत्री ठाकरे

error: Content is protected !!